लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता मिळणार या दिवशी ..

२९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. योजनेची आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली .

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भामध्ये आढावा घेण्यात आला.

काय आहे योजना वाचा सविस्तर

योजनेचे उदिदष्ट
१) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच रोजगार निर्मितीस चालना देणे.
२) त्यांचे सामाजिक ,आर्थिक पुनर्वसन करणे.
३) राज्यातील महिलाना आत्मनिर्भर, स्वावलंबी करणे.
४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
५) महिला आणि त्यांच्यावर विसंबून असलेल्या मुलांचे पोषण ,आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा करणे.

योजनेचे स्वरुप
प्रत्येक पात्र महिलेला दरमहा रु.१५००/- इतकी रक्कम आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे वितरित करण्यात येणार आहे.

Leave a Reply