विश्वनाथ माणिकराव काकडे हे फुलंब्री तालुक्यामधील प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांनी कुक्कुटपालनामध्ये ब्रॉयलर कोंबड्यांचे ४२ दिवसामध्ये विक्रमी १० टन उत्पादन घेतले.केवळ ४२ दिवसामध्ये कुकुपालनातुन १४ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.आता सध्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या दारात दुप्पटीने वाढ झाली असल्यामुळे मोठा आर्थिक फायदा कुक्कुटपालन व्यावसायिकांना झाला आहे.
पारंपरिक शेतीत हाती काहीही उरत नाही त्यामुळे अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत . शेतकरी आता वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करून आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
सफरचंद लागवडीचा नवीन प्रयोग केला ..
विश्वनाथ काकडे यांना ८ एकर शेती आहे. त्यांनी या अगोदर सफरचंद लागवड करून शेतीमध्ये नवीन प्रयोग केला होता.सफरचंद लागवडी मध्ये त्यांना यश आले . त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी केवळ १० गुंठे जागेवर कुकुटपालन व्यवसाय सुरु केला.या व्यवसायात सुरुवातीला जेमतेम नफा मिळाला असला तरी यंदा त्यांना १४ लाखांच्या वर उत्पन्न अवघ्या ४२ दिवसात मिळाले आहे.
अनेक ठिकाणचे कुक्कुट पालन व्यवसाय बंद पडले.
उन्हाचा पारा ४० वर गेला असल्याने या उष्ण तापमानामुळे अनेक ठिकाणचे कुक्कुट पालन व्यवसाय बंद पडले. परंतु विश्वनाथ काकडे यांनी कोंबड्याच्या खाद्याची व पाण्याची व्यवस्था नीटनेटकी केल्यामुळे कोंबड्याचे उत्पादन त्यांना चांगले मिळाले . त्यांनी १० टन कोंबड्यांमधून ६ टन कोंबड्या मंगळवारी विकल्या आहेत. . यातून त्यांना ९ लाख रुपये एकरकमी मिळाले.शुक्रवारी उर्वरित ४ टन कोंबड्या विकल्या जाणार असल्याचे ते सांगतात. यातून उर्वरित ४ टन कोंबड्यातुन त्यांना ५ लाख ४० हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे.
विश्वनाथ काकडे हे पाठबंधारे विभागात नोकरी करत होते २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला २ हजार कोंबड्यांचे उत्पन्न ते घेऊ लागले .आता त्यांचे उत्पन्न १० हजार वर पोहचले आहे . मागील आठवड्यात १२० चा भाव होता. आता १५० वर गेला आहे. पहिल्यांदाच एवढा विक्रमी भाव ब्रॉयलर कोंबड्यांना मिळाला असल्याचे कुकुट पालन व्यवसायिक विश्वनाथ काकडे सांगतात.












