VR Glasses Cow Milk : रशियन कृषी विभागाच्या या जुगाडाने केली कमाल, गायी 40% जास्त दूध देतात..

जग झपाट्याने टेक्नोसॅव्ही तंत्रज्ञान कुशल होत आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान कधी कसे उपयोगी ठरेल हे सांगता येत नाही.  असाच एक अभिनव प्रयोग रशियात सुरू आहे . रशियन कृषी विभागाने गाईचे दूध वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अंगिकार केला आहे.

वी आर ग्लास हे तंत्रज्ञान सध्या तरुणाईत प्रचंड लोकप्रिय आहे.  या तंत्रज्ञांन आधारित तरुणाईला मनोरंजनाचा खास आस्वाद घेता येतो.  त्याचाच वापर काहीच्या दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी करण्यात येत आहे . रशियाच्या कृषी विभागाने हा खास प्रयोग करून उत्पादन वाढल्याचा दावा केला आहे .

सोशल मीडियावर घातला धुमाकूळ.. 

एका युजर ने हा व्हिडिओ अपलोड केला आहे . त्यात गाईच्या डोळ्यावर वी आर ग्लास बसवण्यात आलेले आहेत.  आतापर्यंत हा व्हिडिओ 13 लाखापेक्षा अधिक लोकांनी लाईक केलेला आहे . पाच हजाराहून अधिक कमेंट आलेले आहेत.    पण अनेकांना यावर विश्वास बसत नाही . त्यांना वाटते केवळ ग्लास लावल्यावर कसं दूध उत्पादन वाढू शकते.  जर तुम्ही तुमच्या डेरी वाल्यांना किंवा कोणालाही ही बातमी दाखवली तर त्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

काय काम करते वी आर ग्लास.

गायींच्या डोळ्यावर 24 तासासाठी वी आर ग्लास सेट केला जातो. यामधून त्यांना हिरवे गवत व मैदाने याचा व्हिडिओ दाखवण्यात येतो व त्यामुळेच गाईंचा असा भ्रम होतो की त्या खुल्या मैदानात आहेत आणि गायीचा मूड चांगला राहतो. त्यामुळे गाय अधिक दूध देतात. दूध देण्याची त्यांची क्षमता वाढते..

का पडली व्हीआर सेटची गरज ?

रशियामध्ये सर्वाधिक थंडी असते. जास्त उष्णता अथवा थंडी गाय सहन करु शकत नाही. त्यामुळे गायींच्या डोळ्यांवर VR ग्लास चढविण्यात आले आहेत. हा जुगाड त्यांना गवत आणि खुले मैदाने दिसावीत यासाठी करण्यात येत आहे. त्याचा परिणाम दूध वाढीवर सुद्धा दिसून आला आहे. 

Leave a Reply