राज्यात पावसाला येत्या 10 जूनपर्यंत सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू.

राज्यात पावसाला येत्या 10 जूनपर्यंत सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू.

येत्या दिवसांमध्ये सर्वांचे लक्ष पावसाकडे लागलेले आहे . पाऊस कधी येणार व किती पडणार यावर शेतकऱ्यांचे सर्व गणित अवलंबून असते. 19 मे पासून अंदमान , निकोबार बेटावर अडकलेल्या नैऋत्य मान्सून ने 29 मे रोजी वेग पकडला .

त्यामुळे काही भागांमध्ये 15 जून पासून पावसाला सुरुवात झाली . 22 ते 26 मे या कालावधीत मध्ये पाऊसाने अंदमान निकोबार बेट ओलांडून पुढे बंगालच्या उपसागराकडे सरकायला हवे होते.

 परंतु 31 मे रोजी मान्सून अंदमान निकोबार बेटाच्या पुढे सरकला त्यामुळे नेहमीपेक्षा एक आठवड्याने उशिरा पाऊस येत आहे पाऊस येणार म्हणून शेतकरी आपली कामे उरकण्यासाठी धावपळ करत आहे.

आत्ताचा मान्सूनचा वेग पाहता आंध्र प्रदेश आणि व कर्नाटक ला एक जून च्या दरम्यान पाऊसयेणार आहे.  तसेच ईशान्य मोसमी पाऊस केरळ व तमिळनाडूमध्ये पाच जून पर्यंत सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये 10 जूनच्या सुमारास हा पाऊस येणार आहे.

गुजरात मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड विहार उत्तर प्रदेश ओरिसा बंगाल या ठिकाणी 15 जून च्या दरम्यान पाऊस होणार आहे असे हवामान खात्याने माहिती दिली आहे राजस्थान हरियाणा पंजाब जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड या ठिकाणी वीस जूनच्या सुमारास पाऊस पडेल तसेच टप्पा आठ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे लवकरच पावसाची सुरुवात होईल

Leave a Reply