शेतकऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून दीड लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज होणार मंजूर,याबाबत जाणून घ्या सविस्तर ..

शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी बँकांकडून येणाऱ्या अडचणी आता कमी होणार आहे. देशामधील केवळ दोनच जिल्ह्यांत केंद्र सरकारने एक वेगळा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अॅग्री स्टॅक या अॅपच्या माध्यमातून फक्त एका क्लिकवर मंजूर होणार असून, ते कर्ज थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही विनातारण जमा होणार आहे.हा प्रकल्प येत्या मेपासून उत्तर प्रदेशातील फारुखाबाद आणि महाराष्ट्रामधील बीड या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ई- पीक पाहणी अर्थात पिकांची KISAN CARD किसान कार्ड,RuPay ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून अॅप विकसित केले होते . केंद्र सरकारनेदेखील याच अॅपच्या धर्तीवर सबंध देशासाठी एकाच अॅपमधून पिकांची नोंदणी करण्याचे ठरविले असून,देशभरात एकाच अॅपवर पिकांची नोंदणी येत्या खरीप हंगामापासून केली जाणार आहे. शेतकऱ्यांनाच ही नोंदणी करावी लागते त्यामुळे एकूण पीक क्षेत्राची अचूक नोंद होत आहे.

‘आधार’ला सातबारा उतारे जोडले

■ शेतकऱ्यांचे बैंक खाते पीएम किसान सन्मान निधी योजनेत आधार कार्डशी जोडण्यात आले आहे. तसेच, सर्व शेतजमिनीच्या नोंदीही तपासण्यात आल्या व त्याची सत्यता पडताळण्यात आलेली आहे.

■ बीड व फारुखाबाद या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ई-पीक पाहणी व जमीन नोंदीच्या माहितीचा आधार घेऊन आधार क्रमांकाशी सातबारा उतारे संलग्न करण्यात आले आहेत. आतापर्यंत ६५ टक्के सातबारा उतारे बीड जिल्ह्यामध्ये ‘आधार’ला संलग्न करण्यात आले आहेत.केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात येत्या मे महिन्यात होणार आहे.- निरंजन कुमार सुधांशू, भूमी अभिलेख संचालक तथा जमाबंदी आयुक्त, पुणे

…अशी असेल प्रक्रिया

अॅग्री स्टॅक अॅप डाऊनलोड करून नाव आणि आधार नंबर टाकल्या नंतर ओटीपीतून पडताळणी होईल. शेतकऱ्याची खात्री फेस आयडीच्या माध्यमातून पटविण्यात येईल. 2 शेतकऱ्याला कर्ज पाहिजे असल्यास त्या पद्धतीने माहिती भरून खाते असलेल्या बँकांच्या कर्जाची ऑफर दिसेल.यामध्ये फक्त दहा मिनिटांमध्ये प्रक्रिया करून कर्ज खात्यामध्ये जमा होईल. १ लाख ६० हजारपर्यंतच्या कर्जाला किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे तारण लागत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *