Market Price of Tomato : या’ बाजारात टोमॅटोला मिळतोय चांगला बाजारभाव..

Market Price of Tomato : गुरुवार दिनांक १६ जानेवारी रोजी राज्यातील टोमॅटो आवक कशी झाली आणि कुठे चांगला बाजारभाव मिळाला ते जाणून घेऊ. गुरूवारी पुणे बाजारात लोकल वाणाच्या टोमॅटोची ३२७३ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ६०० रुपये, जास्तीत जास्त १२०० रुपये आणि सरासरी ९०० रुपये बाजारभाव मिळाला.

पुणे जिल्ह्यातील मोशी बाजारात सुमारे साडेसहाशे क्विंटल टोमॅटोची आवक झाली. सरासरी ८५० रुपये बाजारभाव मिळाले. वाई बाजारात टोमॅटोला सरासरी १५०० रुपये बाजारभाव मिळाले, तर सातारा बाजारात सरासरी ९०० रुपये, चाकण बाजारात सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

नागपूर बाजारात टोमॅटोला सरासरी ९०० रुपये, रामटेक बाजारातही हायब्रीड टोमॅटोला सरासरी ९०० रुपये मिळाले. मंगळवेढा, जि. सोलापूर येथील बाजारात टॉमेटोला सरासरी ३०० रुपये असा सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तर कराड बाजारात वैशाली टोमॅटाला आज सर्वाधिक म्हणजेच सरासरी १८०० रुपये बाजारभाव मिळाला. त्या खालोखाल पनवेल बाजारात सरासरी १७५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *