केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली आहे . कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागामधील शंभर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची पडताळणी केली आहे . आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून त्यानुसार राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा गणेशोत्सवापूर्वी लाभ दिला जाणार आहे.
सध्या राज्यातील नागपूर कोकण विभाग वगळता उर्वरित 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. एक जून ते 11 सप्टेंबर या काळात त्या जिल्ह्यांमध्ये सरासरी साठ टक्के सुद्धा पाऊस झालेला नाही
राज्यात शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्याने आता त्यांना पिक विमा सुरक्षित रकमेतील 25 टक्के मिळणार आहे त्यासाठी सरकारला विमा कंपन्यांना 1551 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत शेतकऱ्यांसमोरील अडचणीचा डोंगर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची तयारी सुरू केलेली आहे
ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा चौदावा हप्ता मिळाला त्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सरकारला १५५१ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई केवायसी केलेली नाही. मालमत्तेची एकत्रित नोंद केलेली नाही अशांची यादी प्रसिद्ध करून चावडी वाचनालयाद्वारे योजनेतून वगळले जाणार आहे.
‘नमो महासन्मान’ची स्थिती
▪️ एकूण अर्जदार शेतकरी
▪️ ८९.८७ लाख
▪️ आता लाभ मिळणारे शेतकरी
▪️ ८५.६० लाख
▪️ ई-केवायसी केलेले शेतकरी
▪️ ८०.१५ लाख
▪️ सरकारतर्फे मिळणारी पहिला हप्ता
▪️ १७१२ कोटी
तर ऑक्टोबर मध्ये लाभार्थी कमी होणार
केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता कृषी विभागाला राज्यातील पाच लाख 45 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करून घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या पंधराव्या हप्त्यावेळी ज्याची केवायसी नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचवेळी राज्य सरकारकडून देखील नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता वितरित होणार आहे.