
Tur bajrbahv: बाजारात नवीन तूर हळूहळू यायला सुरूवात झाली असली, तरी या आठवड्यात तुरीचे दर पडलेले दिसून आले. राज्यात सरासरी ७ हजार ते ७२०० रुपये प्रति क्विंटल तुरीचे दर आहेत, हमीभावापेक्षा ते कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तरी तुरीच्या बाजारभावांनी शेतकऱ्यांनी चिंता वाढवली असल्याचे दिसून येत आहे.
आज सोमवार दिनांक १३ जानेवारी २५ रोजी सकाळच्या सत्रात शेवगाव, नगर बाजारात पांढऱ्या तुरीची १४५ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ७ हजार रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी ७२०० रुपये प्रति क्विंटल मिळाले. कर्जत बाजारात सुमारे ५०० क्विंटल तूरीची आवक होऊन सरासरी ७१०० रुपये बाजारभाव मिळाला. जळगाव बाजारात लाल तूरीला ६८०० रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला.
दरम्यान मागील आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवारी लातूर बाजारात लाल तुरीची सुमारे साडेसहा हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी ६ हजार ८०० रुपये तर सरासरी ७४०० रुपये बाजारभाव मिळाला. त्या खालोखाल खामगाव बाजारात २७०० क्विंटल आवक होऊन कमीत कमी ५१०० रुपये आणि सरासरी ६ हजार ७०० रुपयांचा बाजारभाव मिळाला होता.
रविवारी १२ जानेवारीला कर्जत (नगर) बाजारात तुरीची सर्वाधिक १२३८ क्विंटल आवक होऊन कमीत कमी दर ७ हजार आणि सरासरी ७ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा होता.