पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत ,शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० रुपये, महिन्याला जमा करा फक्त 55 रुपये; जाणून घ्या ‘ही’ जबरदस्त योजना..

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत देशातील सर्व लहान अल्पभूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात जीवन जगण्यासाठी सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे.  ही योजना केंद्र सरकारने 31 मे 2019 पासून सुरू केली आहे.

आपण पहिले वारंवार हवामान बदलते त्याप्रमाणे बाजारपेठेतील बेभरवशी असणारे बाजारभाव शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी बऱ्याच वेळा परेशान होतो. शेतकऱ्यांचे आर्थिक खच्चीकरण या ठिकाणी झालेले आपणास दिसते. त्यामुळे शेतकऱ्याला एक आपलं वय झाल्यानंतर वयाच्या साठ वर्षानंतर या ठिकाणी आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत असावा म्हणून येथे पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. आपण सर्व खासगी किंवा इतर वर्गाचा सेवानिवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पैसे दिले जाते आणि त्याच प्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा एक पेन्शन दिले जावे या संकल्पनेतून ही किसान मानधन योजना लागू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजने अंतर्गत वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 3000 रुपये पेन्शनची रक्कम दिली जाणार आहे.

या योजनेला शेतकरी पेन्शन योजना असेही म्हणतात. शेतकऱ्यांनी या ठिकाणी दोन पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतो किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन नोंदणी करू शकतो. शेतकरी पेन्शन योजना 2023 अंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे वय 18 ते 40 वर्ष असावे या किसान मानधन योजनेचा लाभ दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती असणाऱ्या लाभार्थ्यांना दिला जाईल . या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा कोणत्याही कारणामुळे जर मृत्यू झाला तर लाभार्थ्याच्या पत्नीस दरमहा दीड हजार रुपये दिले जातील. 

पंतप्रधान किसान मानधन योजनेच्या प्रीमियमचा भरणे..

किसान पेन्शन  योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा प्रीमियम भरावा लागेल.  अठरा वर्ष वयाच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल . तर 40 वर्ष वयाच्या लाभार्थ्यांना दोनशे रुपये प्रीमियम भरावा लागेल.  वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.  पीएम किसान मानधन योजना 2023 अंतर्गत लाभार्थ्यांची बँक खाते असले पाहिजे.  बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे, या योजनेअंतर्गत वृद्धापकाळात  दिलेली रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

या योजनेसाठीच्या पात्रता?

देशातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र मानले जातील.  2 हेक्टर किंवा त्याच्यापेक्षा कमी शेत जमीन असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.  अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे . आधार कार्ड, ओळखपत्र ,वय प्रमाणपत्र ,उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर ,पासपोर्ट आकाराचे फोटो ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.  या योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी या https://maandhan.in/  वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *