कांदा खरेदी केंद्रावर नाफेडच्या अध्यक्षानकडून अचानक पाहणी ,चौकशीत काय आढळले जाणून घ्या सविस्तर ..

‘नाफेड’शिवाय ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ तसेच व्यापारी आणि अधिकारी यांची तयार झालेली साखळी ,शेतकऱ्यांची नाफेडच्या माध्यमातून होत असलेली फसवणूक या सर्व बाबीचा नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी पंचनामा केला. त्यांनी नाशिक जिल्ह्यामधील नाफेडच्या कांदा खरेदी-विक्री केंद्रांवर अचानक पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांना अनेक दोष आढळून आले. नाफेडशिवाय कृषी अधिकाऱ्यांनाही कांदा खरेदी केंद्रांची पाहणी होत असल्याची भनक अध्यक्षांकडून लागली नाही.

अध्यक्ष जेठाभाई अहीर हे शुक्रवारी सकाळी देवळा येथील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर आले होते . त्यामुळे केंद्रावर उपस्थित असलेल्या नाफेडच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली. नाशिक जिल्हा दौऱ्यावर खासगी दौऱ्याचे कारण सांगून अध्यक्ष तिथे आले होते.

चौकशीत काय आढळले?

– ऑनलाइन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा आहे का? याचे बारकावे अध्यक्षांनी तपासले.
– शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून न घेता कांदा खरेदी बाजार समितीतून केली जात होती .
– विक्रीसाठी आलेल्या मालापेक्षा गोडावूनमध्ये दुप्पट कांदा आढळून आला.
– आधार कार्डवर शिक्के मारून ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये गडबडीचा संशय.
– अध्यक्षांना कांदा खरेदी-विक्री व्यवहारात दलाली होत असल्याचा संशय आला .
– चुकीच्या पद्धतीने काम ५ ते ६ खरेदी केंद्रांवर सुरू असल्याचे आढळून आले.

अध्यक्षांनी आतापर्यंत खरेदी केलेल्या कांद्याचा हिशेब तपासला. तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी का झाला? म्हणून अध्यक्षांनी अधिकाऱ्यांनाही जाब विचारला.

चाैकशीसाठी कमिटी नेमणार

काही दोष आढळून आल्यामुळे संपूर्ण चौकशीसाठी नाफेडच्या खरेदी केंद्रांवर कमिटी नेमली जाणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *