कोल्हापुरातील वडगावमधील जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात बोकड आणि शेळ्यांची मोठी आवक मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण जवळ आल्यामुळे पहायला मिळाली. बाजारात अन्य जनावरांच्या तुलनेमध्ये बकऱ्यांचा मोठा बाजार भरला होता. या बाजारामध्ये बिटल,कवठेमहांकाळ,आटपाडी, कच्ची, अंडील , शिरुर,अशा विविध जातींचे पालवे, बोकड विक्रीसाठी आले होते. याचा व्यापार करण्यासाठी व्यापारी, शेतकरी याची गर्दी झाली होती.
व्यापारासाठी रत्नागिरी,जत-माडग्याळ, आटपाडी, मिरज, सातारा,पलूस , रहिमतपूर, अशा विविध भागांमधून शेतकरी, व्यापारी खरेदी-विक्रीसाठी आले होते. पहाटेपासून बाजार सुरू झाला. बाजाराच्या आवारामध्ये पूर्वेस हा बाजार भरतो. मोठ्या प्रमाणात बकरी विक्रीसाठी येऊन देखील बाजारात खरेदीदारांची संख्या कमीच होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सांगितले कि बकऱ्यांच्या किमती कमालीच्या कमी झाल्या आहेत.
वडगाव बाजार समितीमध्ये भरलेल्या बाजारामध्ये वेगवेगळ्या जातींच्या बकऱ्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती यामध्येच या बाजारात अठरा लाख किमतीचा डोक्यावर चाँद असणारा वैशिष्ट्यपूर्ण देशी बोकड विक्रीसाठी आला होता. बाजारातील व्यापाऱ्याने हा बोकड सात लाख किमतीस मागितला होता , परंतु व्यवहार झाला नाही. या बाजारात खरेदीदारांची संख्या कमी व बकऱ्यांची आवक जास्त असल्यामुळे बकऱ्यांचा दर कमी झाला .
या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात सर्वात जास्त किमतीचा बोकड विक्रीसाठी आला होता. नामदेव तुकाराम आवळेकर (रा. बोमनाळ, ता. अथणी, जि. बेळगाव) यांनी पाळलेला बोकड लोकांचे खास बाजारात आकर्षण ठरला. त्या बोकडचे वय तीन वर्षे आहे व तो जवळ जवळ पंच्याहत्तर किलो वजनाचा आहे.
या बोकडाच्या कपाळावर चाँद आहे त्यामुळे त्याची किंमत अठरा लाख होती. बाजारात त्याची सात लाखास एका व्यापाऱ्याने मागणी केली, परंतु व्यवहार होऊ शकला नाही. वडगावच्या बाजारामध्ये विक्री न झाल्यास त्या बोकडास कराड,मिरज, मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार आहे असे बोकडाच्या मालकाने सांगितले. अशी अशा आहे कि त्याला मुंबईला चांगला दर मिळेल, त्याची हलगीच्या तालावर बाजारातून त्याच्या मालकाने मिरवणूक काढली होती.