एकीकडे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पाणी संकट निर्माण झाले असतानाच, दुसरीकडे त्याच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील काही विभागामध्ये मंगळवारी अवकाळी पाऊस परभणी , बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये बरसला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहेत. काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे.
बीडमध्ये तासभर पाऊस, वीज कोसळून गाय ठार
बीड जिल्ह्यामध्ये मंगळवारी मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली. सकाळपासूनच या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते . परंतु , दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा अवकाळी पावसाला सुरवात झाली.एक तास जवळपास पाऊस सुरू होता. यावेळी धारूर, परळी ,अंबाजोगाई,तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे.तर, काही ठिकाणी पाऊस पडल्याने दुपारच्या सुमारास लोकांना उष्णतेपासून काही वेळ दिलासा मिळाला आहे . तसेच, धारूर तालुक्यातील मोरफळा या गावामध्ये एका गाईच्या अंगावर वीज पडून गाय ठार झाली आहे.
नांदेडामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
मंगळवारी नांदेड जिल्ह्यात देखील बीडप्रमाणे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 43 अंशावर जिल्ह्यात तापमानाचा पारा पोहचल्याने नागरिकांना प्रचंड उष्णतेचा त्रास सहन करावा लागत होता.अचानक वादळी वारे आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हजेरी लावली. नागरिकांचीअचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. नांदेड शहरासह अर्धापूर ,कंधार, लोहा, यासह अनेक तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
हिंगोलीत शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान…
मंगळवारी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह हिंगोली जिल्ह्यांमध्ये संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील मसोड गावाच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पहायला मिळत आहे.या अवकाळीमुळे शेतामध्ये उभ्या असलेल्या ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दीड एकर ज्वारीच्या पिकाचे लक्ष्मण सातव या शेतकऱ्याच्या शेतातील अतोनात नुकसान झालेले आहे. काढणीला आलेली ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत.
मिरचीच्या पिकाचे अतोनात नुकसान..
हिंगोली जिल्ह्यामधील मसोड गावाच्या शिवारामध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. या गारपेटीचा फटका मोठ्या प्रमाणात भाजीपाला वर्णीय पिकांना बसला आहे. अशोक सातव या शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर मिरचीला या गारपिटीचा फटका बसला आहे. साधारणता एक लाख रुपये खर्च करून लहानाचे मोठे केलेल्या मिरचीच्या पिकाचचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .झाडाला असलेल्या मिरच्या ना गारा लागल्यामुळे मिरच्या तुटून जमिनीवर पडल्या आहेत.. त्यामुळे मिरच्यांचा सडाच शेतामध्ये सगळीकडे पाहायला मिळतोय. शेतकरी अशोक सातव यांचे गारपिटीमुळे दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचचे शेतकरी सांगता आहेत.












