Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा की ३ कारणं अडकवणार ?

Santosh Deshmukh Case:  सगळ्यात आधी वाल्मिक कराड चर्चेत आला ते त्याच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे त्यानंतर त्याच्या नावाची चर्चा झाली. वाल्मिक कराड फरार असल्यामुळे मग तो पुण्यात सीआयडी पुढे सरेंडर झाला आणि मागचे 21 दिवस त्याला पोलीस कोठडी मध्ये राहावं लागलं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हाच त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती नियमानुसार 14 दिवसांपेक्षा जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळत नसल्यामुळे वाल्मिक कराड 14 तारखेलाच बाहेर येणार का अशी ही चर्चा होती ,पण त्यानंतर त्याला एसआयटीन ताब्यात घेतलं.

त्याच्यावर मुक्का लागला आणि वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढला पण या झाल्या काही दिवस आधीच्या घटना त्यापेक्षा महत्त्वाची आहे ती सध्याची अपडेट वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सीआयडीन त्याची चौकशी पूर्ण झाल्यानं वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली नाही वाल्मिक कराडला सीपीएपी मशीन देण्यासही कोर्टाने मंजुरी दिली आहे. सीआयडी गरज लागेल तेव्हा वाल्मिक कराडला चौकशीसाठी बोलवू शकेल असं असंही सांगितलं जातंय साहजिकच चर्चा होऊ लागली आहे ती वाल्मिक कराडच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे का या गोष्टीची सीआयडीनं चौकशी पूर्ण झाल्याचं सांगणं कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं त्याचा जामीनाचा मार्ग खरंच मोकळा होऊ शकतो का पाहूयात ,या लेखामध्ये आधी बघूयात बीडच्या कोर्टात नेमकं काय घडलं तर मुक्का अंतर्गत मिळालेली सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर कॉल्मिक कराडला वीसी द्वारे कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी सीआयडीन वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण झाली आहे असं सांगितलं सीआयडीनं वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली नाही आणि वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

कोर्टात हजर करण्याआधी डॉक्टरांनी वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली होती ज्यामध्ये त्याला सर्दी आणि ताप झाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे त्याला डॉक्टरांनी औषध दिली . त्यानंतर हे आजारपण आणि कराडला असलेला स्लीप ॲपनिया हा आजार यामुळे त्याला सीपीएपी मशीन देण्यात यावं अशी मागणी कराडच्या वकिलांनी कोर्टात केली ती मागणी सुद्धा मंजूर झाली आहे इतके दिवस पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं आणि चौकशी पूर्ण झाल्यानं त्याला जामीन मिळण्याच्या चर्चा वाढल्या आहेत पण कराडला जामीन मिळणं खरंच शक्य आहे का मुळात 21 जानेवारीलाच कराडचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. ज्यामध्ये तो विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक गुले कृष्णा आंधळे महेश केदार हे एकत्र दिसतात हे सगळेजण विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जातात आणि साधारण पंधरा मिनिटांनी बाहेर येतात हे सीसीटीव्ही फुटेज आहे केस मध्ये असलेल्या विष्णू चाटेच्या ऑफिसच्या बाहेरच पण यात महत्त्वाचं म्हणजे हे सीसीटीव्ही फुटेज 29 नोव्हेंबरचा आहे म्हणजेच ज्या दिवशी अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांनी आपल्याला खंडणीची धमकी मिळाल्याची तक्रार दिली होती खंडणीसाठी विष्णू साठे फोन केला होता.  वाल्मिक कराड धमकी दिली होती आणि सुदर्शन घुले 29 नोव्हेंबरला प्रत्यक्ष
ऑफिसमध्ये आला होता अशी तक्रार शिंदेंनी केली होती .  त्याच दिवशी हे सगळे आरोपी एकत्र दिसल्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होऊ शकते सीआयडी आता या फुटेजच्या अनुषंगाने तपास करू शकते असं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात मात्र सीआयडी न वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण झाल्याचं सांगितलं त्यातच गरज लागली तर सीआयडी कराडला पुन्हा चौकशीसाठी बोलावू शकते असंही सांगण्यात आलं साहजिकच चर्चा सुरू झाली जामीनाची वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर त्याच्या जामीनासाठी अर्ज केला जाईल अशी माहिती त्याच्या वकील वकिलांकडून देण्यात येत होती पण वाल्मिक कराडवर मुक्का लागला आणि न्यायालयीन कोठडी लांबणीवर गेली आता 22 तारखेला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी कराडच्या वकिलांकडून लगेचच जामीनासाठी अर्ज करण्यात आला नाही पण जर हा अर्ज करण्यात आला.  तर जामीन मिळू शकतो का तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला असला तरी त्याला जामीन होण्याची शक्यता फार कमी आहे याची तीन महत्त्वाची कारणं सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागतात.

पहिलं कारण म्हणजे चार्जशीट तयार नसून सीआयडीन आपली चौकशी पूर्ण झाली आहे असं सांगितलं असलं तरी अजूनही चार्जशीट दाखल झालेली नाही आता ही चार्जशीट दाखल होण्यासाठी इतर गुन्ह्यांमध्ये 90 दिवसांचा कालावधी देण्यात येत असला तरी वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असल्यानं चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिसांना 180 दिवसांचा वेळ आहे आता या वेळेत पोलीस वेगवेगळ्या अँगलन चौकशी करू शकतात एखादा पुरावा निसटला आहे असं वाटलं तर एखादा पुरावा नव्याने मिळाला तर किंवा एक एखादा साक्षीदार नव्यानं पुढे आला.  तर या प्रकरणात पुन्हा चौकशी आणि तपास सुरू होईल मोक्याचं प्रकरण असल्यानं डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यापर्यंत चार्जशीट सहीसाठी जाईल त्यामुळे ही चार्जशीट आणखी तपास केल्यानंतरच दाखल होईल अजूनही पुढे येत असलेले पुरावे कृष्णा आंधळे फरार असणं या गोष्टी सुद्धा चार्जशीट दाखल करण्यात महत्त्वाच्या आहेत चार्जशीट दाखल करायला पोलिसांकडे 180 दिवसांचा कालावधी आहे आणि चार्जशीट दाखल होईपर्यंत वाल्मिक कराडला जामीन मिळणं प्रचंड अवघड आहे. 

कराडच्या जामीनाचा मार्ग मोकळा नसल्याचं दुसरं कारण म्हणजे कोर्टाचं कराड बद्दलचं मत कोर्टात चार्जशीट सादर केल्यानंतर कोर्टाकडून चार्जशीट वाचलं जाईल त्यात त्या गुन्ह्यांमध्ये कराडचा संबंध स्पष्ट करणारे पुरावे आहेत का हे सुद्धा पाहिलं जाईल साक्षीदारांची तपासणी सुद्धा होऊ शकते त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कराडचा या गुन्ह्यातला सहभाग त्याला शिक्षा होण्या इतपत गंभीर नसल्याची खात्री जर कोर्टाला पटली त्याचा थेट संबंध नाही हे निष्पन्न झालं तरच त्याच्या जामीनाचा चा मार्ग मोकळा होऊ शकतो . पण सध्या कराडवर होणारे आरोप त्याचं पुढे आलेलं सीसीटीव्ही फुटेज संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर त्याचे आणि आरोपींचे फोन कॉल झाल्याची पुढे आलेली माहिती या सगळ्या गोष्टी यात महत्त्वाच्या ठरतील चार्जशीट दाखल होईपर्यंत वाल्मिक कराडला जामीन मिळणार नाही आणि चार्जशीट दाखल झाली तरीही ती चार्जशीट वाचून कोर्टाचं मत काय तयार होतं हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरेल त्यामुळे न्यायालयीन कोठडी मिळाली म्हणजे जामीनाचा मार्ग मोकळा असं होताना दिसणार नाही .

वाल्मिक कराडला जामीन मिळणं अवघड असण्याचं तिसरं कारण म्हणजे कोर्टात होऊ शकणारा युक्तिवाद संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गंभीर आहे ज्या पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली ते सुद्धा अमानवीय आहे.  हत्या प्रकरणातले सगळे आरोपी वाल्मिक कराड सोबत दिसले आहेत आणि या सगळ्यांवर संघटित गुन्हेगारीचा ठपका ठेवत मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यात अजूनही कृष्णा नळे सापडलेला नाही . वाल्मिक कराड फरार असताना कुठे होता याची माहितीही मिळालेली नाही . त्यामुळं जर जामीन मिळाला तर कराड पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकतो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जाऊ शकतो त्यातही कराड आणि त्याच्या साथीदारांवर होणारे आरोप गंभीर आहेत असे गंभीर आरोप असलेल्या आरोपीला जर कोर्टाकडून जामीन मिळत असेल तर यामुळे न्यायव्यवस्थेबद्दल कोर्टात चुकीचा मेसेज जाऊ शकतो असा युक्तिवाद सुद्धा केला जाऊ शकतो साहजिकच कराडच्या वकिलांना मेडिकल ग्राउंड सोडले तर जामीन मिळावा असा अर्ज करण्यासाठी युक्तिवाद करणे अवघड असल्याचं मत व्यक्त  केलं जातंय.  मुळात कराडवर दाखल असलेली केस ही मुख्याची केस आहे.

त्यामुळे इतर प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर जामीनाचा मार्ग मोकळा होत असला तरी वाल्मिक कराडच्या बाबतीत असं घटणं अवघड आहे.  सीआयडीने सुद्धा गरज पडल्यास वाल्मिक कराडला चौकशीसाठी पुन्हा कोठडी मिळावी अशी मागणी कोर्टात केली आहे . त्यामुळे जरी आता न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी वाल्मिक कराड लगेच सुटेल जामीनावर बाहेर येईल अशी परिस्थिती सध्या नाही दुसऱ्या बाजूला अजूनही पोलिसांना न सापडलेल्या कृष्णा आंधळेला वॉन्टेड घोषित करण्यात आले तपासाचे चक्र वेगाने फिरत असले तरी कृष्णा आंधळे मात्र पसार आहे पण या सगळ्यात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं चार्जशीट कधी दाखल होणार आणि चार्जशीट मध्ये नेमकं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि माहितीपूर्ण लेख पाहण्यासाठी कृषी २४ वेबसाईडला भेट द्यायला विसरू नका .

Leave a Reply