
Tomato market: आज दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात पुणे बाजारसमितीत टोमॅटोची २६ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ८०० रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव १२०० रुपये आणि सरासरी १ हजार रुपये असे आहेत.
दरम्यान काल बुधवारी दिनांक २२ जानेवारी रोजी टोमॅटोला पुणे बाजारसमितीत सरासरी ८५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला होता. काल या बाजारात टोमॅटोची १६७७ क्विंटल आवक झाली. किमान दर ५०० रुपये होता. खडकी बाजारात ८००, तर पिंपरी बाजारात ९५० रुपये प्रति क्विंटल दर होते.
खेड-चाकण बाजारात टोमॅटोचे बाजारभाव घसरलेले दिसले. या ठिकाणी टोमॅटोची २९० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ५००, जास्तीत जास्त १००० आणि सरासरी ८०० रुपये बाजारभाव मिळाले. संगमनेर बाजारात टोमॅटोला सरासरी ५६० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.
दरम्यान पनवेल बाजारात एक नंबर टोमॅटोची ६२५ क्विंटल आवक झाली. कमीत कमी २५०० रुपये, जास्तीत जास्त ३ हजार आणि सरासरी २७५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.