प्रतिक्षा संपली ! नाशिकमधून जायकवाडी धरणात सोडलं पाणी…

यंदा माॅन्सूनच्या पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली . त्यामुळे जायकवाडी धरणात 50 टक्के पेक्षा कमी पाणी साठा शिल्लक आहे.  त्यामुळे समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याची मागणी होत होती.

त्यामुळे , महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन भागांमध्ये संघर्ष सुरू झाला होता . त्याचवेळी राज्य सरकारने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा दारणा धरणातून जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी सोडले.

मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात सध्या पाणीसाठा 45 टक्के वर आहे.  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवडनुसार जायकवाडी धरणातील पाणीसाठा ६५ टक्के च्या जवळपास असावा यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणा मधून पाणी सोडले जाते.  त्यानुसार यंदा मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीसाठी 8.6 टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यात संघर्ष सुरू आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व साखर कारखानदारांनी विरोध केला पाण्यावरून रस्त्यावरून च्या लढाई सोबत न्यायालयीन लढाई सुरू झाली यात सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास ग्रीन सिग्नल दिला.

राज्य शासनाने शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास धारणा धरणातून शंभर क्युरीसने विसर्ग करण्यात आला शासन आदेशानुसार मुळामहा प्रकल्पातून प्रकल्पातून २.१०, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजापूर) प्रकल्पातून ३.३६, गंगापूर धरणातून (गोदावरी, काश्यपी, गौतमी गोदावरी), ०.५, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, वाकी, दारणा, मुकणे,भाम, भावली, वालदेवी) जायकवाडीत प्रकल्पातून २.६४ टीएमसी असे एकूण ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *