काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट यांनी थैमान घातलं होत . मागच्या महिन्यात गारपिट व अवकाळी पावसामुळे शेतकरण्याची पिके उद्ध्वस्त झाली . त्यामुळे सर्व शेतकरी खूप चिंतेत आहेत.
उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे खूप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागला होता . परंतु आता अवकाळी पाऊस लवकरच थोड्यादिवस थांबणार आहे. अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे . २ तारखेनंतर ४ तारखेपर्यंत पाऊस उघडणार आहे . परंतु ५ मे ते ७ मे या तारखेच्या दरम्यान परत राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे.
तसेच ३ मे रोजी पश्चिम महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्रात, विदर्भ,मराठवाडा या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा जास्त जोर मराठवाड्यात व विदर्भ येथे राहणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात ही पाऊस पडणार आहे.
पाच ते सात या तारखे पर्यंत उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, धुळे या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय मराठवाड्याच्या काही ठिकाणी व विदर्भात या तारखेला पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे. असा पंजाब डख यांचा अंदाज आहे.
राज्यात आणखी काही दिवस पाऊस पडणार आहे, पण नंतर अवकाळी पाऊस विश्रांती घेईल यामुळे दिलासा मिळण्याची शेतकऱ्यांना शक्यता आहे.