millet and sorghum : उन्हाळी बाजरीचे तणनियंत्रण आणि ज्वारी काढणीचे व्यवस्थापन असे करा..

millet and sorghum

millet and sorghum : उन्हाळी बाजरी आणि ज्वारीसाठी महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या आठवड्यासाठी पुढील प्रमाणे शिफारस केली आहे.

ज्वारीचे व्यवस्थापन:
ज्वारीचे पीक जातीपरीत्वे ११० ते १३० दिवसांत काढणीस तयार होते. ज्वारीच्या दाण्याच्या टोकाजवळ काळा ठीपक्याचे लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित अवजारे फुले ज्वारी काढणी यंत्राने करावी व ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवून मळणी करावी.

धान्य उफणनी करून तयार झाल्यानंतर, त्याला साठवणुकीपूर्वी पुन्हा उन्हात वाळवावे. साधारणतपणे ५० किलोची पोती भरून ठेवल्यास, पुढे बाजारपेठेत विक्री करणे सोपे जाते. म.फु.कृ.वि., राहुरीद्वारे विकसित सुधारित फुले ज्वारी काढणी यंत्र हाताने ज्वारी मुळासह उपटणे कष्टदायक असते.

तुलनेने कमी कष्टात ज्वारी काढता येते. बागायती तसेच कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढण्यासाठी उपयुक्त ज्वारीच्या ताटाची जाडी कितीही जास्त असली तरी या यंत्राद्वारे सहज शक्य होते. वजनाला हलके (२.१ किलो) असल्याने उचलून नेणे सोपे व वापरासाठी सुलभयंत्राची कार्यक्षमता ८ ते १० गुंठे ज्वारीची ताटे प्रति दिन

उन्हाळी बाजरी आंतरमशागत व तण नियंत्रण
बाजरीच्या पेरणीपासून सुरवातीचे ३० दिवस शेत तण विरहित ठेवणे गरजेचे असते. याच कालावधीत तण व पिकामध्ये हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते. दोनवेळा कोळपणी व गरजेनुसार दोनवेळा खुरपणी करावी.

मजूरटंचाई असल्यास, पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी अॅट्राझिन (५० डब्ल्यूपी) ४०० ग्रॅम प्रति एकरी प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर सम प्रमाणात फवारणी करावी. उन्हाळी बाजरी पिकाला उर्वरित ४५ किलो नत्र २५ ते ३० दिवसांनी खुरपणी केल्यानंतर द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *