
केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना चांगला फायदा व्हावा त्याचे आरोग्य आणि आर्थिक जीवनमान सुधारावे यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात . त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे . आज आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजूरांसाठी राबवण्यात आलेली ‘आम आदमी विमा’ योजनेबद्दल माहिती देणार आहोत.
राज्यातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती हा आहे. तसेच शेतकऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. आपल्या शेतात शेतकरी कष्ट करून आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत असतात. मुलांचे शिक्षण पूर्ण करत असतात. परंतु अकालीपणे शेतकऱ्याचे किंवा शेतमजूराचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट येत असते अशा वेळेस सरकारने त्याच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ‘आम आदमी विमा’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा किंवा शेतमजुराचा विमा उतरवला जातो. आणि निधन झालेल्या व्यक्तीच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते .
योजनेच्या नियम व अटी काय आहेत?
1. १८ ते ५९ इतके लाभार्थी शेतकऱ्याचे वय असावे.
२. लाभार्थी व्यक्ती ही कुटुंबातील कमावती व्यक्ती असावी.
३. जिरायत ५ एकर किंवा बागायत अडीच एकर शेती असणे गरजेची आहे. शेत मजुरासाठी जमिनीची अट नाही.
४. कुटुंबातील एका प्रमुख व्यक्तीला विम्याचे संरक्षण मिळेल.
५. कुटुंब म्हणजे नवरा, बायको आणि अविवाहित मुले यांचा
समावेश.
रक्कम विभागणी
१. विम्याच्या अंतिम मुदतीपूर्वी लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये मिळणार.
२. लाभार्थी व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला किंवा कायमचे अपंगत्व आल्यास, तसेच अपघातात दोन्ही डोळे , दोन्ही पाय, एक डोळा व एक पाय निकामी झाले तर ७५ हजार रुपये मदत मिळणार.
३. अपघातामुळे जर एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये मदत मिळणार.
लाभार्थी व्यक्तीचे निधन झाल्यास इयत्ता ९ ते १२ शिकणाऱ्या कोणत्याही दोन मुलांना प्रत्येकी १२०० रुपये मिळणार.
आवश्यक कागदपत्रे
१. शेतकरी व शेतमजुरांचे प्रत्येक वर्षी गावातील तलाठ्यामार्फत विहित नमुन्यातील अर्ज भरून घेतले जातात.
2.यासाठी अर्जदाराने आपल्या अर्जासोबत रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, निवडणूक ओळखपत्र किंवा वयाचा दाखला जोडण्यास बंधनकारक आहे.
३. जी भूमिहीन व्यक्ती आहे तीने भूमिहीन असल्याचा,तसेच जी व्यक्ती शेतकरी आहे त्या व्यक्तीने सातबारा 8 अ चा उतारा अर्जासोबत जोडावा. आणि शेतमजूर असल्याचा दाखला अर्जासोबत जोडावा.
४. अर्जदाराने केलेले अर्ज पुढे जाऊन तलाठ्यामार्फत संकलित केलेले जातात आणि मंडल अधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदार कार्यालयाकडे पाठवण्यात येतात.
दरम्यान, या योजनेबाबत तुम्हाला अधिकची माहिती तुम्ही तलाठी, मंडल अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालय यांच्याशी संपर्क साधू शकता.