Onion market price : लासलगाव, पुणे सोलापूरचे कांदा बाजारभाव कसे आहेत?

kanda bajarbhav: सोमवारी राज्यभरातील एकूण कांदा आवक २ लाख २ हजार ३४३ क्विंटल इतकी होती. तर मंगळवारी १ लाख ६६ हजार ५४४ क्विंटल इतकी आवक झाली. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आवक घटल्याने कांदा बाजारभाव टिकून आहेत, तर काही बाजारात पुन्हा किंचितसे वधारताना दिसत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कांदा आवक काल मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सुमारे ८४ हजार क्विंटल इतकी होती. सोलापूरची आवक २१ हजार ७८१, तर पुणे जिल्ह्यातली आवक सुमारे २१ ते २२ हजार क्विंटल अशी राहिली. नगर जिल्ह्यात सुमारे ११ हजार क्विंटल आवक झाली.

मंगळवारी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी लासलगाव बाजारसमितीत लाल कांद्याची सुमारे २१ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव १ हजार, जास्तीत जास्त ३ हजार आणि सरासरी २५५१ रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सोमवारच्या तुलनेत लासलगावला बाजारभाव वाढताना दिसले. पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांदयाला सरासरी २४५० रुपये बाजारभाव मिळाले.

मालेगाव मुंगसे बाजारात कांदयाला सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. सिन्नर बाजारात सरासरा २५०० रुपये, कळवण बाजारात २४०० रुपये बाजारभाव मिळाले. येवला तालु्क्यतील अंदरसूल बाजारात २३०० रुपये बाजारभाव मिळाले. चांदवड बाजारात २३५० आणि मनमाड बाजारात २३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले, तर देवळा बाजारात २५०० रुपये बाजारभाव मिळाले.

पुणे बाजारात सुमारे १३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. सरासरी २१५०, कमीत कमी १५०० रुपये, जास्तीत जास्त २८०० रुपये बाजारभाव मिळाले. जुन्नर आळेफाटा बाजारात सरासरी २२०० रुपये बाजारभाव मिळाले. संगमनेर बाजारातील भाव वधारलेले दिसून आले. येथे सरासरी २ हजार प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. राहता बाजारात २२०० रुपये, कोपरगाव बाजारात २५०० ते २६५० सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

सांगली बाजारात सरासरी २०५० रुपये, कराड बाजारात हळव्या कांद्याला २५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

Leave a Reply