Soyabin bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला काय मिळतोय बाजारभाव?

soyabin bajarbhav : राज्यात सोयाबीनचे बाजारभाव अजूनही फारसे वधारलेले दिसत नाही. दिनांक १३ व १४ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये झालेल्या सोयाबीनच्या आवक व बाजारभावाचा आढावा घेतला असता, राज्यात १३ मे रोजी सरासरी बाजारभाव ४१७० रुपये प्रति क्विंटल होता. १४ मे रोजी ही आवक किंचित घसरून ३५,०८२ क्विंटल इतकी झाली आणि सरासरी बाजारभाव ४१५० रुपये प्रति क्विंटल राहिला. सरकारी हमीभावापेक्षा हे दर कमीच आहेत.

दरम्यान या कालावधीत लातूर बाजार समितीत सर्वाधिक म्हणजेच १४ मे रोजी ७३१७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्या दिवशी लातूरमध्ये सरासरी बाजारभाव ४२५० रुपये प्रति क्विंटल होता. याउलट, राहता बाजारात केवळ २ क्विंटलची आवक नोंदली गेली. मात्र येथे कमाल बाजारभाव ४२५० रुपये इतका होता, जो काही मोठ्या बाजारपेठांएवढाच आहे.

पिवळ्या व पांढऱ्या प्रकारांमध्येही लातूर बाजारातच सर्वाधिक आवक दिसून आली. लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची ७३१७ क्विंटल तर लातूर-मुंड येथे ३५ क्विंटल इतकी आवक होती. येथे अनुक्रमे सरासरी बाजारभाव ४२५० व ४२०० रुपये प्रति क्विंटल इतका होता. पांढऱ्या सोयाबीनमध्ये लासलगाव-निफाड येथे ७९ क्विंटलची आवक झाली असून सरासरी बाजारभाव ४३५१ रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आला.

१४ मे २०२५ रोजी लातूर, अमरावती, लासलगाव आणि हिंगोली या प्रमुख बाजारात सरासरी बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :

लातूरमध्ये सोयाबीनचा सरासरी भाव ४२५० रुपये नोंदवला गेला.
अमरावतीत ३०९६ क्विंटल आवकेसह सरासरी भाव ४१६५ रुपये इतका होता.
लासलगावमध्ये ५२८ क्विंटल आवकेसह सरासरी भाव ४३०० रुपये होता.
हिंगोली बाजारात ८०० क्विंटल आवक झाली असून सरासरी बाजारभाव ४१७५ रुपये इतका नोंदवला गेला.

सद्यस्थितीत राज्यभरात सरासरी बाजारभाव हमीभावापेक्षा थोडा कमी असून, उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवण्यासाठी मूल्यवर्धन, साठवणूक व थेट विक्रीच्या पर्यायांवर विचार करण्याची गरज आहे.