Sangli market : सांगलीच्या बाजारात गुळाला काय भाव मिळतोय?

jaggery

Sangli market : एका बाजूला ऊसाचा गळीत हंगाम सुरू आहे. साखर कारखाने काय दर देतात? किती गाळप होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, तर आजही राज्यात सांगली, कोल्हापूर, नगर, संभाजीनगर परिसरात गुऱ्हाळघरं सुरू असून पारंपरिक रित्या गुळ तयार करण्यात येत आहे.

मागील आठवड्याचा विचार करायचा तर राज्यात सरासरी दररोज सुमारे २५०० ते ३ हजार क्विंटल गुळाची आवक होत असून सर्वाधिक आवक ही अर्थातच सांगली बाजारात होत आहे.

तर मंडळी आपण आज कुठल्या बाजारात गुळाला काय भाव मिळाला, ते जाणून घेऊ.

आज दिनांक ४ जानेवारी रोजी सांगली बाजारात स्थानिक प्रतीच्या गुळाची सर्वाधिक म्हणजे अकराशे क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ३३५०, जास्तीत जास्त बाजारभाव ४०४० तर सरासरी बाजारभाव ३६९५ इतका मिळाला.

पुणे बाजारात एक नंबरच्या गुळाची सुमारे सव्वापाचशे क्विंटल, तर दोन नंबर गुळाची आवक सुमारे १९० क्विंटल झाली. एक नंबरला सरासरी ३८०१ रुपये, तर दोन नंबर गुळाला सरासरी ३५४४ रुपये बाजारभाव मिळाला.

दरम्यान सोलापूर बाजारात पिवळ्या गुळाची आज अवघी ९५ क्विंटल आवक झाली. या ठिकाणी सरासरी ४२५१ रुपये बाजारभाव मिळाला. आज सांगलीच्या खालोखाल मुंबई बाजारात गुळाची आवक झाली. म्हणजेच ५७९ क्विंटल. याठिकाणी सर्वाधिक म्हणजेच सरासरी साडेपाच हजाराचा आणि जास्तीत जास्त ६ हजाराचा प्रति क्विंटलला भाव मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *