Dairy farming : जनावरांमध्ये कासदाह झाल्यास काय उपाययोजना कराल ?

Dairy farming: रोग प्रतिकारक्षमता कमी असेल तर गाई, म्हशी लवकर आजारी पडतात. व्यवस्थापन आणि आहार या दोन्हीतून कासदाह आजाराला दूर ठेवता येते.

सडावाटे हे जीवाणू कासेत प्रवेश करीत असल्यामुळे गोठ्यातील व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. गोठ्याची रचना, स्वच्छता, गाई, म्हशींच्या सडांना जंतुनाशक द्रावणात बुडविणे, बसण्याच्या जागी वाळू, राख, लाकडाचा भुसा, चुना वापरावा.

दूध काढणीयंत्राची स्वच्छता राखावी, प्रत्येक गायीचे दूध काढण्याअगोदर हात धुवून घ्यावेत. जंतुनाशक द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे.
आहार व्यवस्थापनात प्रथिने आणि ऊर्जा यांचे संतुलन, शरीराची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सेलेनियम, जीवनसत्त्व ई तसेच झिंक आणि बायोटीनचा वापर करावा.

कासदाह झाल्यानंतर किंवा लक्षणे दिसून आल्यानंतर पशुवैद्यकीय मदत, खराब दुधाची योग्य विल्हेवाट लावावी. गोठ्यात नवीन येणाऱ्या गाई, म्हशी जीवाणूंच्या सुप्त वाहक असू शकतात. म्हणून नवीन जनावरे पशुवैद्यकाकडून तपासून कुठलाही आजार नसल्याची खात्री करून घ्यावी.

Leave a Reply