Rabi sowing : गव्हाचे क्षेत्र वाढले, तेलबियांचे घटले, देशभरात अशी आहे रब्बीची पेरणी

wheat

Rabi sowing : यंदाच्या रब्बी हंगामात देशभरात 614 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा गव्हाच्या पेरणीअंतर्गतचे क्षेत्र 319.74लाख हेक्टरवर पोहचले आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 313 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती. गव्हाचे पेरणी क्षेत्र वाढले असून तेलबियांचे क्षेत्र घटले आहे.

दरम्यान देशाचे सरासरी रब्बी क्षेत्र ६३५ लाख हेक्टर असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. मागील वर्षी ६११ लाख हेक्टर रब्बी पेरा होता, यंदा ६१४ लाख हेक्टर पेरा झाला आहे. मात्र सरासरी रब्बी क्षेत्राच्या तुलनेत तब्बल २ लाख हेक्टरने रब्बीचा पेरा देशभरात घटला आहे.

याशिवाय यंदाच्या रब्बी हंगामात 136.13 लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची शेती झाली असल्याची नोंद झाली आहे. तर 48.55 लाख हेक्टर क्षेत्रावर श्री अन्न,भरड धान्यांची पेरणी झाली असल्याचं कृषी मंत्रालयानं कळवलं आहे.

यासोबतच यंदाच्या रब्बी हंगामात तेलबियांच्या पेरणीनं 96.15 लाख हेक्टरचा टप्पा ओलांडला असल्याची माहितीही कृषी मंत्रालयानं दिली आहे. मागील वर्षी तेलबियांचा पेरा १०१.३७ लाख हेक्टर इतका होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *