
gahu sheti : गहू पिकात मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच मेटेंन्हायझीयम अॅनीसोप्ली ५० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून या जैविक किटकनाशकाची संध्याकाळी फवाराणी करावी.
किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) १ ग्रॅ किंवा अॅसिटामिप्रिड २० (एसपी) ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाचे अंतराने अंतराने गरजेप्रमाणे १ ते २ फवारण्या कराव्यात
(पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता गहू पिकातील फवारणीचे कामे पुढे ढकलावीत)
बागायती हरभरा
सद्य स्थितीत असलेल्या ढगाळ हवामानामुळे हरभरा पिकावर पाने खाणाऱ्या अळीचे प्रादुर्भाव झालेला आहे म्हणून पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रणासाठी हेलीओकील ५ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता हरभरा पिकातील फवारणीचे कामे पुढे ढकलावीत.)
जिरायत हरभरा:
घाटे अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे ५० मिटर अंतरावर शेतात उभारावेत आणि दर १५ दिवसांनी ल्युर बदलावेत. घाटे अळीच्या प्रादुर्भाव दिसून येताच ५% निंबोळी आर्काची फवारणी करावी.
ढगाळ हवामान असल्यामुळे जिरायती हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी एच.एन.पी.व्ही. या विषाणूची १० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.