राज्याच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार?; पाहा हवामान अंदाज?

राज्याच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार; पाहा हवामान अंदाज

विश्रांती दिलेल्या पावसाने राज्यामध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.  दोन दिवसापासून राज्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होत आहे.  तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.  पुढील दोन ते तीन दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 

मुंबई व ठाण्यात ढगाळ वातावरण सह अधून मधून जोरदार पावसाच्या सरी होत असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केले आहे. याशिवाय नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 

येत्या काही दिवसात विदर्भात आणखीन जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान खात्याने दिल्या आहेत. आज खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर मध्य महाराष्ट्रातील पुणे ,नगर, सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर कोकणात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्यात दंडी मारलेल्या पावसाने पुन्हा तुरळक प्रमाणात का होईना हजेरी लावली आहे.  गेल्या चार ते पाच दिवसापासून राज्याच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस होत आहे.  विशेषता मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे . मात्र पाऊस चा जोर ओसरणार असून कमी दाबाचा पट्टा हा आग्नेय राजस्थान आणि मध्य प्रदेशाकडे सक्रिय झालेला आहे.  हा पट्टा राज्यापासून दूर जात असल्याने राज्यात पावसाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. 

मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विशेषतः नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज देण्यात आला आहे.  मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात पावसाची शक्यता आहे.  पुण्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून काही ठिकाणी तुरळ पाऊस पडण्याची शक्यता असून . 

पुढील काही दिवस आकाशात अंशतः ढगाळ वातावरण राहून दुपारनंतर सामान्यतः हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. .भंडाऱ्यात गडचिरोली चंद्रपूर , गोंदिया ,  नागपूर 20 आणि 21 ला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.  या जिल्ह्यात पावसाचा वेग जास्त राहणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *