![soybean bajarbhav](https://krishi24.com/wp-content/uploads/2025/02/soybean-bajarbhav-1.webp)
soybean bajarbhav:सोयाबीन हमीभाव खरेदीला मुदत वाढविली, मात्र तरीही सोयाबीनचे बाजारभाव सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटलच्या खालीच आहे. मात्र अजून संपूर्ण फेब्रुवारी महिना बाकी असून नंतरच्या काळातही सोयाबीनचे बाजारभाव वधारण्याचे काहीही चिन्हे नाहीत. जाणून घेऊ याबद्दल
सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे तेलबिया पिक आहे. अमेरिका, ब्राझील, आर्जेन्टिना, चीन व भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या प्रमुख देशातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे ९० टक्के सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळे या देशातील सोयाबीनची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकामध्ये होणाऱ्या बदलाचा सोयाबीनच्या किमतीवर परिणाम होत असतो.
सन २०२२-२३ च्या तुलनेत सन २०२३-२४ मध्ये सोयाबीन तेलाची आयात कमी झाली आहे. (स्रोत: SEA अहवाल, जानेवारी २०२५).
अमेरिकन कृषी विभागाच्या, (USDA, जाने, २०२५) अहवालानुसार सन २०२४-२५ मध्ये, जगात ४२८९ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८.६ टक्केनी (३९४७लाख टन, २०२३-२४) अधिक आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची मासिक आवक कमी आहे. नोव्हेंबर नंतरची आवक ही मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. तसेच चालू वर्षी सोयाबीनध्या किंमती मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहेत.
भारतात सन २०२४-२५ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १२८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ७.७९ टक्केनी अधिक आहे. (स्रोत: USDA, जानेवारी २०२५)
सोयाबीनच्या किंमती कशा असतील?
सन २०२४-२५ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत रु. ४८९२ प्रती क़्विटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत (स्रोत: Agmarknet). मागील तीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील सरासरी किंमती खालील प्रमाणे होत्याः
फेब्रुवारी २०२२: रु.६५३९ प्रती क्विटल.
फेब्रुवारी २०२३: रु. ५३१७ प्रती क्विटल.
फेब्रुवारी २०२४: रु. ४५२० प्रती क्विटल.
सन २०२३-२४ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. चालू वर्षी एप्रिल ते डिसेंबर २०२४ मध्ये १४.८५ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील निर्यातीपेक्षा अधिक आहे (१२.१० लाख टन). स्रोत: SEAअहवाल, जानेवारी २०२५)
लातूर बाजारातील संभाव्य बाजारभाव फेब्रुवारी २०२५ मध्ये रु. ४००० ते ४४०० प्रती क्विटल असतील सदर संभाव्य किंमत अंदाज हा FAQ ग्रेडच्या सोयाबीनसाठी आहे. पुणे येथील बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाच्या तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला आहे.