Shettale Anudan Yojana : शेतकरी बांधवांना पाण्याची उपलब्धता बारामाही राहावी या अनुषंगाने शेततळे बनवण्यासाठी, कुपननलिका खोदण्यासाठी, विहिरी खोदण्यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. शेततळे खोदण्यासाठी आधी मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अनुदान दिले जात होते.
मात्र आता यामध्ये मोठा बदल झाला असून मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासनाकडून अहमदनगर जिल्ह्यासाठी 930 शेततळे बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच पुणे जिल्ह्यासाठी 600 शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे.
औरंगाबाद :- 640, जालना :- 470, बीड :- 630 शेततळ्यांचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना आकारमानानुसार अनुदानाचे प्रावधान आहे. यामध्ये आकारमानानुसार 75000 पर्यंतच अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी या योजनेअंतर्गत अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत.
सर्वप्रथम करण्यासाठी लागणारी कागदपत्रे जाणून घ्या
या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्तीसाठी अर्जदार शेतकरी बांधवांना 7/12 व 8A, बँक पास बुक, आधार कार्ड, परिक्षण अहवाल, जातीचा दाखला, पासपोर्ट फोटो लागणार आहेत. या कागदपत्रांची पूर्तता करून शेतकरी अर्ज करून शकणार आहेत.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ केवळ शेतकरीच घेऊ शकतात. म्हणजेच ज्यांच्या नावाने शेतजमीन आहे असेच शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
तसेच अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर किमान एक एकर जमीन असेल तरच तो शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरेल.
याशिवाय जर अर्जदार शेतकरी बांधव अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून येत असेल तर त्याला जातीचा दाखला देखील सादर करावा लागणार आहे.
या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी किती मिळते अनुदान
30 बाय 30 बाय 3 मीटर शेततळ्यासाठी 75 हजार पर्यंतच अनुदान मिळू शकते असं या योजनेत प्रावधान आहे.
5 बाय 15 बाय 3 मीटर शेततळ्यासाठी या योजनेअंतर्गत 35000 ते 50000 पर्यंतच अनुदान मिळू शकतं.
तसेच 30 बाय 15 बाय 3 मीटर शेततळ्यासाठी या योजनेअंतर्गत 50000 च अनुदान देण्याचं प्रावधान आहे.
अर्ज करण्याची सविस्तर प्रोसेस
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन घ्यावे लागेल. यासाठी शेतकरी बांधव आपला युजरनेम आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात किंवा आधार कार्ड आणि ओटीपीच्या माध्यमातून देखील लॉगिन घेता येणार आहे.
लॉग इन केल्यानंतर होम पेजवर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला सिंचन साधने व सुविधा समोरील बाबी निवडा ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी सात बाबींपर्यंत बाबी निवडायच्या आहेत.
यानंतर सक्सेस दाखवलं जाईल यावर ok क्लिक करा.
नंतर तुमच्याकडे कोणतं सिंचन स्रोत आहे ते निवडा, जसे की, उपसा सिंचन / कूपनलिका / कालवा / शेततळे / विहीर / शेततळे.
यानंतर तुम्ही सिंचनासाठी कोणता ऊर्जा स्रोत वापरतात हे निवडायचा आहे. म्हणजेच वीज, सौर ऊर्जा किंवा इंधन चलित पंप यापैकी तुम्ही जे वापरत असाल ते निवडायचे आहे.
यानंतर तुम्हाला सिंचनाची सुविधा वं उपकरणे निवडावी लागणार आहेत. जसे की ठिबक, तुषार, उपसा सिंचन इत्यादी
यानंतर तुम्ही सिंचनासाठी वापरत असलेले उपकरण किती एचपी चा आहे ते निवडा.
यानंतर ही बाब सक्सेसफुली ऍड झाल्याचे दिसेल.
यानंतर पुन्हा होम पेजवर या आणि पुन्हा अर्ज करा यावर क्लिक करा. सिंचन साधने व सुविधा यामध्ये बाबी निवडा यावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज खुलेल. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये तुमचा जमिनीचा तपशील आणि वैयक्तिक माहिती भरा आणि यानंतर सिंचन साधने व सुविधा निवडा. यानंतर बाबन एवढा पर्याय अंतर्गत वैयक्तिक शेततळे वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला किती आकाराचा शेततळ तयार करायच आहे हे निवडा.
यानंतर माहिती जतन करा मग सक्सेस झालं असं दिसेल.
पुन्हा तुम्हाला मुखपृष्ठवर नेलं जाईल. या ठिकाणी उजव्या साईडला अर्ज सादर करा क्लिक केल्यानंतर ओके असं नोटिफिकेशन येईल त्यावर क्लिक करा.
यानंतर पहा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही ज्या बाबींसाठी अर्ज केला असेल त्या बाबींची यादी येईल त्याला तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला पेमेंट करावा लागणार आहे. 23.60 रुपयांचा शुल्क भरावा लागेल.
पेमेंट करण्यासाठी आपण यूपीआय, नेट बँकिंग यांसारख्या पर्यायाचा वापर करू शकणार आहात.
पेमेंट झाल्यानंतर आपली अर्ज प्रक्रिया पुरी होईल.