राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान: २०२४-२५ या आर्थिक वर्षात कडधान्य आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे. या गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त १२ लाख ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान विविध केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत दिले जाणार आहे.
योजनेचे फायदे –
◼️ २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी ५०% अनुदान मिळणार
◼️ शेतकरी उत्पादक कंपनी/संघाच्या खात्यात अनुदान रक्कम थेट जमा
◼️ बँक कर्जासह योजना राबवणे शक्य
◼️ शेतकऱ्यांना कृषी माल साठवण्यासाठी योग्य आणि माफक दर
इथे करा अर्ज – तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करा.
आवश्यक कागदपत्रे:
सातबारा,
आधारकार्ड,
बँक खात्याचा तपशील
अर्ज जमा करण्याची शेवटीची तारीख: ३१ जुलै २०२४
शेतकऱ्यांना आवाहन:
शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
योजनेचे महत्त्व:
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतमाल साठवणुकीसाठी योग्य आणि माफक दरातील सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल योग्य किंमतीला आणि योग्य वेळी विकण्यास मदत होणार आहे . त्यामुळे , या योजनेमुळे शेतमालाची शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल. नुकसान कमी होण्यास मदत होईल .