संपूर्ण बातमी वाचल्यावर तुम्ही हि म्हणाल नाद केला पण वाया नाही गेला, तर झालंय आस कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे बंधूंनी ह्या हंगामातील द्राक्षे बाजारात आणली आहेत.
इतक्या प्रतिकूल हवामानात इतक्या लवकर द्राक्षे बाजार आणल्या मुळे ढवळे बंधू परिसरातील तसेच राज्यातील लोकांच्या चर्चेचा विषय झाले आहेत. सर्व स्तरावून त्याच शेतकरी बांधवांचे कौतुक करत आहेत. नंदकुमार ढवळे व विकास ढवळे यांनी बाजारात आणलेल्या द्राक्षला प्रति पेटी ( ४ किलो ) ५०१ रुपये भाव मिळाला आहे. त्यांनी दहा गुंठ्यामध्ये रुपये ६ लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. नियमित द्राक्ष हंगाम हा नोव्हेंबर ते एप्रिल मध्ये असतो पण ढवळे बंधूनी जोखीम घेत या वर्षी बाजी मारली आहे .
छाटली नियोजन
ढवळे बंधूनी ३० जूनला छाटणी घेतली होती त्यामुळे सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात त्यांचा माल बाजारात जाण्यासाठी तयार झाला.राज्यामध्ये सांगली जिल्यातील द्राक्षे उत्तम गुणवत्ते साठी देशात प्रशिध्द आहेत त्यामुळे ह्या जिल्यातील द्राक्षाला देशातील विविध भागात चांगली मागणी आसते. आता ढवळे बंधू माल देखील चेन्नई व हैदराबाद ला जाणार आहे.
लाखोत विक्रमी उत्पादन आणि उचांकी दर
त्यांनी दहा गुंठ्यामध्ये रुपये ६ लाखाचे उत्पन्न मिळवले आहे व त्यांना द्राक्षला प्रति पेटी ( ४ किलो ) ५०१ रुपये भाव मिळाला आहे. हा दर जिल्यातील उचांकी दर आहे.
इतर शेतकऱ्या पुढे आदर्श
द्राक्ष हे अतिशय संवेदनशील पीक आहे, खराब वातावरणात हे पीक लवकर बळी पडत , तसेच द्राक्ष पिकासाठी इत्तर पिकांच्या तुलनेत जास्त खर्च देकील येतो परंतु आसे आसताना ढवळे बंधूनी जोकीम पत्करून चांगले यश मिळवले आहे. ढवळे बंधूनी केलेला प्रयोग हा इतर शेतकऱ्यानं साठी आदर्श ठरला आहे. ढवळे बंधूनी दाखवून दिल आहे कि मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जीवावर आपण मोठं उद्दिष्ट गाठू शकतो.