कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी बाजारभाव मिळू लागला आहे. त्यामुळे साठवणुकीतला कांदा आळेफाटा बाजार समितीत दाखल होऊ लागला आहे. परिणामी बाजार समिती आवारात वाहनांच्या रांगाच रांगा दिसू लागल्या आहेत.
जुन्नर मध्ये टोमॅटो नंतर आता कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यात सरकार नाफेड चा कांदा बाजारात आणण्यापूर्वी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी साठवणुकीतला कांदा बाजारात आणला आहे.
शेतकऱ्यांनी साठवणुकीतला कांदा बाजारपेठेमध्ये आणल्यामुळे आवक वाढली असून देखील बाजार चांगला मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. पुढील काही दिवस कांद्याचे बाजार भाव असेच राहिले तर शेतकरी पुन्हा एकदा लखपती होतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
दरम्यान नाफेडची खरेदी केलेला कांदा सरकारने बाजारात आणल्यास कांद्याची आवक जास्त वाढवून बाजार पडेल की काय अशी शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. यापूर्वी वातावरणातील बदल आणि पावसामुळे साठवणुकीतील कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाढत्या बाजारभावामुळे
कांद्याचे नुकसान भरून निघत असल्याने शेतकऱ्यांना वाढत्या बाजारभावामुळे आधार मिळाला आहे.दर चांगला मिळत असल्याने शेतक-यांत समाधान असल्याचे चित्र बाजार समितीत आहे.