सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशनकार्ड मोबाइलवर मिळणार…

सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशनकार्ड मोबाइलवर मिळणार...

रेशन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर सध्याच्या कार्यपद्धतीनुसार तपासणी होऊन योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे . हे रेशन कार्ड संबंधित लाभार्थ्याला पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.यामध्ये अन्नसुरक्षा योजना राज्य योजनेच्या रेशन कार्ड धारकांचा समावेश आहे.

यामुळे एजंटचा त्रास कमी होऊन मोफत कार्ड उपलब्ध होणार आहे.अर्जदारांनी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल अर्जदारास संकेतस्थळावरून रेशन डाऊनलोड करता येईल.

प्रत्येकाला ई रेशन कार्ड.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या ,अंत्योदय अन्न योजना राज्य योजनेच्या, एपीएल शेतकरी व प्राधान्य कुटुंब योजना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने व्यतिरिक्त रेशन कार्ड धारक अशा सर्व रेशन कार्डधारकांना आता ऑनलाईन सेवेद्वारे रेशन कार्ड सुविधा निशुल्क उपलब्ध होणार आहे. कोणत्याही रेशन कार्ड धारकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याच्या अर्जाची तपासणी करून पात्र ठरणाऱ्या रेशन कार्ड धारकाला या योजनेनुसार ऑनलाईन रेशन कार्ड देण्यात येईल.

9000 जणांना मिळाले कार्ड.

पुणे शहरात ई रेशन कार्ड पासून देण्यात सुरुवात झाली आहे.  त्यानुसार आतापर्यंत 8921 पुणेकरांनी हे रेशन कार्ड ऑनलाइन रित्या मिळवले आहे.

शहरातील तीन लाख रेशन कार्डधारक.

शहरात अन्नपुरवठ्याचे 11 विभाग आहेत त्या तीन लाख 35 हजार 307 रेशन कार्ड आहेत या रेशन कार्डचा बारा लाख 56 हजार 154 सदस्यांना होत आहे राज्य सरकारकडून आता  रेशन कार्ड मिळणार आहे ते ऑनलाईन अर्ज करून उपलब्ध होतील संगणक मोबाईल लॅपटॉप वर ई रेशन कार्ड कोणालाही डाऊनलोड करून ठेवता येणार आहे.  गरज पडल्यास त्याची प्रिंट देखील घेऊ शकता विशेष म्हणजे या ई रेशन कार्ड साठी पैसे लागणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *