मागील काही दिवसापासून देशात पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे आता वाहन चालकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. अनेक जन पेट्रोलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत.
तर कोणी खाजगी वाहने टाळू लागले आहेत ,असे असताना आता याच वाहनचालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. सध्या केंद्र सरकार समोर महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे .महागाई कमी करण्यासाठी सरकार मोठी पावले उचलण्याच्या तयारीत आहेत.
केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेल च्या दरात कपात करण्याची घोषणा करू शकते ,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पेट्रोल वरील कर कमी करण्यासोबतच खाद्यतेल व गव्हासारख्या अन्नधान्यांवरील आयात शुल्क कमी होऊ शकते.
विविध मंत्रालयाच्या निधीमधून एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता सरकारने वर्तवलेली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेल वरील कर कमी करण्याच्या नियोजनात मोदी सरकार आता व्यस्त आहे . गेल्यावेळी देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यात आले होते. 21 मे रोजी अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केले होते.
यावेळी देखील सरकार पेट्रोल व डिझेलच्या किमतीत मोठी कपात करण्याची शक्यता आहे.जवळपास 19 रुपये पेट्रोल वरती आणि साधारणपणे पंधरा रुपये डिझेल वरती इतका कर केंद्र सरकार घेत असते त्याच्या संदर्भात वारंवार टीका सुद्धा होत असते . पेट्रोल डिझेलचे दर शंभरच्या आसपास पोहोचले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही कपात करता येईल का? आणि ती कपात करताना वित्तीय तूटीचे समीकरण सुद्धा बिघडू द्यायचे नाहीत अशी दुहेरी कसरत मोदी सरकारला करावी लागणार आहे.
वित्तीय तूट म्हणजे तीचा भार अधिक वाढू नये यासाठी काही मंत्रालयाचे बजेट कमी केले जाऊ शकते . अर्थात हि सध्या सगळी चर्चा आहे. कधी नेमका निर्णय होतो हे बघावे लागेल पुढच्या निवडणुकाचे शेडूल बघता हे होऊ शकते.