कांदा प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण आजच्या (दि.२६) या बैठकीत काही तोडगा निघाला नाही. कांदा व्यापाऱ्यांचे मत या बैठकीत जाणून घेण्यात आले आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारशी आणि नाफेडशी संबंधित असल्याने आज पुन्हा सह्याद्री अतिथीगृहावर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत बैठक होणार आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
आजच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार पणन मंत्री अब्दुल सत्तार अन्न नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती होती पण या बैठकीमध्ये काही कोणत्याही तोडगा निघाला नाही त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय पियुष गोयल यांच्याशी बोलून तरी तोडगा काढणार का हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.
आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे अशी माहितीचे पण भुजबळ यांनी दिली आहे व्यापाऱ्यांच्या सर्व मागणी केंद्र शी निगडित आहेत.असे छगन भुजबळ यावेळी सांगत होते. यामुळे आज सायंकाळी सात वाजता राज्याचे मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची बैठक पार पडणार आहे.
व्यापाऱ्यांच्या काय आहेत मागणी..
१) एनसीसीएफ आणि नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये.
२) रेशन मार्फत खरेदी केलेला कांदा ग्राहकांना द्यावा.
३) ४० टक्के कांद्यावर लादलेले निर्यात शुल्क रद्द करावे.
४) चार टक्के संपूर्ण देशात विक्रेत्याकडून आडत घ्यावी.
५) ५० टक्के सरसकट देशांतर्गत वाहतुकीवर सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी.
६) बाजारभाव वाढल्यानंतर चौकशी करू नये.
कांद्याचे निर्यात शुल्क रद्द करावेत नाफेड चा कांदा विक्रीवर थांबवण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून व्यापारी कांदा लिलाव पूर्णपणे बंद केला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांद्याची विक्री मार्केटमध्ये न करता रेशनवर करावी.प्रति शेकडा 100 रुपयास 1 रुपयाऐवजी मार्केट फीचा दर 100 रुपयास 0.50 पैसे या दराने करण्यात यावा. संपूर्ण भारतात एकच आडतीचे दर असावे . कांदा व्यापाऱ्यांनी बुधवार दि. १९ पासून लिलाव आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील बंदचा निर्णय घेतला.
या बैठकीमध्ये कांदा व्यापारी आपल्या मागणीवर ठाम राहिले परंतु सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांची समजत काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे सायंकाळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत व त्यानंतर शासन योग्य तो निर्णय घेईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.