Honey production : दोन युवा उद्योजक मित्रांनी केली मधुपुष्प हनीची निर्मिती,वाचा सविस्तर…

लहानपणापासूनचे जिवलग मित्र असलेले प्रतीक कर्पे व सतीश शेळके यांनी प्रशिक्षणातून तसेच उद्योजकतेचे गुण आत्मसात करून मध व त्यावर आधारित उत्पादने निर्मिती सुरू करण्यात आली. ग्राहकांचे नेटवर्क , आउटलेटस, फ्रँचायसी यांच्याद्वारे आपल्या गुणवत्ताप्राप्त मधाला मधुपुष्प हनी या ब्रँडद्वारे आवश्यक उलाढीलासह सर्वत्र लोकप्रिय देखील केले आहे.

सातारा जिल्ह्यातील बोरजाईवाडी (ता. कोरेगाव) येथील राजेंद्र कुमार कर्पे व कोरेगाव येथील सतीश मुरलीधर शिर्के हे बालपणीचे मित्र आहेत. प्रतीक प्रोडक्शन इंजिनियर तर सतीश कृषी पदवीधारक आहे. दोघांनी काही काळ नोकरीचा अनुभव घेतला. परंतु शेती व अन्न प्रक्रिया क्षेत्रात स्वतःचे काही करावे यावर दोघांचे एकमत झाले. त्यासंदर्भात शोध सुरू असताना दोघांनी पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन केंद्राला भेट दिली. तिथे परराज्यातून मधुमक्षिपालन प्रशिक्षणासाठी आलेल्या मधमाशीपालकांची भेट झाली. या दोघांसाठी हा अभ्यासक्रम नवा होता . आणि हाच दोघांसाठी आयुष्य बदलणारा क्षण ठरला. येथे दोघांनी निवासी शास्त्रीय प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला.

प्रशिक्षण आणि उद्योगाची सुरुवात:

अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केला. पण प्रात्यक्षिक ज्ञान काहीच नव्हते. त्यासाठी विदर्भ, महाबळेश्वर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानपर्यंत दोघे फिरले. पेट्या कुठे, कशा ठेवायच्या,फुलोरा हंगाम पाहून मधाचे अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल असे सर्व बारकावे माहित करून घेण्याबरोबर त्यातील प्रत्यक्ष अनुभवही घेतला. घरून पैसे घ्यायचे नाहीत असे दोघांनीही ठरवले होते. त्यानुसार शासकीय योजनेतून 200 मधपेट्या घेतल्या. दहा लाखाची गुंतवणूक त्यासाठी केली. पेट्या ठेवणे व त्यात मध गोळा करण्यास कोल्हापूर, विदर्भ व राजस्थानात जाऊन सुरुवात झाली.

स्वब्रॅण्डची निर्मिती:

प्रतीक यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या जागी संकलित मधाचे पॅकिंग होऊ लागले.पण मोठ्या कष्टाने तयार केलेल्या मधाला अपेक्षित दर व्यापारी देत नव्हते. माल घेऊन गेले तरी काही कंपन्यांमध्ये जादा मार्जिन मागत होते.भाव पाडून मागत होते. बराच दिवसांनी रक्कम थोडी थोडी करून चुकवत होते. या व्यवहारात आपल्या हाती नफा लागत नाही हे लक्षात आले.आर्थिक विवंचनानी ते ग्रासून गेले. कर्जाचे हप्ते तर दर महिन्याला चुकवणे सुरू होते. चांगल्या दर मिळवायचा तर स्वतःच्या ब्रॅण्ड घेऊन ‘मार्केट ‘ मध्ये उतरले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यातून 2017 मध्ये मधुपुष्प हनी हा स्वब्रॅण्ड निर्माण झाला. आणि तिथून उद्योगाला मोठी चालना मिळाली.

उद्योग व ‘फिल्ड’ वरील काम: 

सूर्यफूल, तुळस, जांभूळ, ओवा, निलगिरी, जंगलातील विविध फुलापासून मधनिर्मिती केली. त्यासाठी विदर्भ, मध्य प्रदेश,तापोला, महाबळेश्वर, पाचगणी, राजस्थानात मधपेट्या ठेवल्या . पूर्वीच्या दोनशे पेट्यांची संख्या आता एक हजारापर्यंत गेली. शेतकऱ्यांना परागीभवनासाठी त्यांचा उपयोग होतो. फिल्ड वर्क’ साठी 16 कामगार आहेत.

उत्पादन व पार्किंग:

कोरेगावात २०२१ मध्ये 3000 चौरस फूट जागेत प्रक्रिया युनिट आहे. मध साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग व उपपदार्थाची येथे निर्मिती होते.
सतीश यांच्याकडे उत्पादन निर्मितीची तर प्रतीक यांच्याकडे मार्केटिंगची जबाबदारी आहे. सतीश यांच्याकडे उत्पादन निर्मितीची तर प्रतीक यांच्याकडे मार्केटिंगची जबाबदारी आहे. पॅकेजिंगसाठी सहा जण कार्यरत आहे. मधाला मानवी हात लागू नये यासाठी स्वयंचलित सिलिंग व पॅकिंग यंत्रणा आहे.प्रति मिनिटात सहा ते सात बॉटल्स भरण्यात येतात. 250 ग्रॅम, अर्धा व एक किलो काचेच्या बॉटलमध्ये पॅकिंग असते. एक किलो मधाची किमान किंमत 620 रुपये आहे. जांभूळ, तुळशी मधाची किंमत 850 रुपये आहे.

मार्केटिंग:

कृषी प्रदर्शने, ग्राहक महोत्सवातून मोठ्या प्रमाणात सहभाग घेणे व (हंगामात वीस ते पंचवीस प्रदर्शनातून भाग) त्यातून मोठ्या प्रमाणात ग्राहक नेटवर्क तयार केले. वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथील हॉटेल्स व अन्य ठिकाणी शनिवार, रविवारी जाऊन तिथे स्टॉल्स भाडेतत्वावर घेतले. मधाचे नमुने देऊन त्याची शुद्धता, दर्जा ग्राहकांना पटवून दिला . ‘ऑरगॅनिक’, ‘शुगर फ्री’, ‘आरोग्य उपयोगी’, परदेशाप्रमाणे ‘हनी पार्लर’आदी संकल्पना राबवल्या. लोअर परेल, गोरेगाव, डोंबिवली,मुंबईत विलेपार्ले तसेच पुणे, शिरवळ, बीड (मराठवाडा) येथे फ्रॅंचायसी. स्वतःची दोन आउटलेटस. (कोरेगाव, शिरवळ) मधुपुष्प नावाने वेबसाईट बनवली. त्यावरूनही ‘ऑर्डर्स’घेतल्या जातात. आयुर्वेदिक डॉक्टरांनाही औषधे निर्मितीसाठी मधाचा पुरवठा केला जातो.

उलाढाल:

पाच वर्षाचा तयार झाला अनुभव. वर्षाला 35 ते 40 टन मध निर्मिती केली जाते. 80 लाख ते एक कोटीपर्यंत उलाढाल होते. हवामानातील विविध बदलांचा फटका या उद्योगाला बसतो. त्यानुसार अर्थकारणातही चढ-उतार होते.

सामान्य व अन्य यश :

राज्य शासनाचा मधुमित्र पुरस्कार (महाबळेश्वर येथे मधमाशीदिनावेळी) बारामती येथील कृषी महाविद्यालयाकडून शेतकरी मित्र पुरस्कार भेटला.सरकारी प्रशिक्षणे कार्यशाळाही प्रतीक, सतीश घेतात. डॉक्टरांनी रुग्णांना तुळशीचा मध घेण्याचा सल्ला कोरोनाचा काळात दिला. त्यावेळी रुग्णांना तो मोफत पुरवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून प्रदर्शनात स्टॉलला भेट व कौतुक करण्यात आले.

Leave a Reply