
Tomato bajarbhav: आज मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी पुणे- पिंपरी बाजारात टोमॅटोला कमीत कमी १२००, जास्तीत जास्त १३०० रुपये आणि सरासरी १२५० रुपये बाजारभाव मिळाला. सकाळच्या सत्रात या बाजारात २९ क्विंटल टोमॅटोची आवक झाली.
दरम्यान काल सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या सुरूवातीला पुणे बाजारात टोमॅटोची १८३५ क्विंटल आवक झाली होती. कमीत कमी ६०० रुपये, जास्तीत जास्त १२०० रुपये तर सरासरी ९०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. सांगली जिल्ह्यातील विटा बाजारात टोमॅटोची १०० क्विंटल आवक होऊन सरासरी ६५० रुपये बाजारभाव मिळाले.
मुंबई बाजारात एक नंबर दर्जाच्या टोमॅटोची २४०२ क्विंटल आवक झाली. कमी कमी बाजारभाव १ हजार जास्तीत जास्त १४०० रुपये आणि सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. पनवेल बाजारात टोमॅटोची एक नंबर दर्जाची ६९१ क्विंटल आवक झाली. कमीत कमी २५०० रुपये, जास्तीत जास्त ३ हजार आणि सरासरी २७५० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाला.
दरम्यान सोलापूर बाजारात राज्यातील सर्वाधिक बाजारभाव मिळाला. या ठिकाणी वैशाली टोमॅटोची २५२ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव १०० रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव ६००० रुपये आणि सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव होते.