Diversion for agriculture : रब्बी हंगामातील पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऊस, भाजीपाल्यासह रब्बीच्या पिकांना फायदा होणार आहे.
बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी निळवंडे धरणांमधून शेतीसाठी सिंचन आवर्तन सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रवरा नदीमध्ये सुमारे 1700 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग सोडण्यात आलेला असल्याची माहिती कार्यकारी अभियं (से. नि.) हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार काल सायंकाळी ७ च्या सुमारास हे आवर्तन सोडले.
रब्बी हंगामासाठी सोडलेले हे दुसरे आवर्तन असून पुढील २० ते २२ दिवस हे आवर्तन चालणार आहे. त्याचा काही प्रमाणात उन्हाळी हंगामालही फायदा होणार आहे. अलीकडेच अनेकांनी पूर्व हंगामी आणि हंगामी ऊसाची लागवड केली असून त्यांच्यासाठी या आवर्तनाचा फायदा होणार आहे. सद्या निळवंडे आणि भंडारदरा धरणांचा मिळून एकूण १५ हजार २४७ द. ल. घ. फूट इतका पाणीसाठा असल्याचे समजते.












