Agriculture Minister Chamber : शेतकऱ्यांसाठी राज्यात आता विभागस्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन होणार…


Agriculture Minister Chamber : आधुनिक तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचणे सुकर होणार आहे. यासंदर्भात नागपूरच्या एका कार्यक्रमात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घोषणा केली.

कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विभागनिहाय प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील वनामती येथील सभागृहात शेतकऱ्यांनी अनेकविध सूचना, अपेक्षा, अडचणी कृषीमंत्र्यासमोर मांडल्या.

शेतक-यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठात अनेक नवनवीन प्रयोग होत असतात. या प्रयोगाची माहिती ही शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. शेतकरी हा प्रयोगशील असतो. त्यामुळे शेतक-यांचे प्रयोग हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचे मंत्री श्री. कोकाटे यावेळी म्हणाले.

शेतकरी शेतात नवे-नवे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवत असतात. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाने पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी कृषी संलग्न विविध प्रात्यक्षिके आयोजित करावीत. तंत्रज्ञानामध्ये पुढे जात शेतीसाठी ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ए. आय. तंत्रज्ञान पोहोचविण्याचा मानस आहे, असल्याचेही कृषी मंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply