broiler poultry : पोल्ट्रीसाठी ब्रॉयलर शेडमधील नियोजन कसे करावे?

broiler poultry

broiler poultry : कुक्कुटपालनात शेडमधील नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. त्याबददल जाणून घेऊ या.

अधूनमधून खाद्याची भांडी बुरशीसाठी तपासून घ्यावीत. भांड्यांमध्ये बुरशी आढळून आल्यास ती स्वच्छ धुवावीत. उन्हामध्ये पूर्णपणे वाळवूनच वापरावीत.
शेडमध्ये आजारी पक्षी आढळून आल्यास लागलीच बाजूला ठेऊन त्वरित उपचार करावेत.

पिल्ले किंवा कोंबडीची मरतूक झाली असल्यास त्यांना लागलीच बाजूला करून रोग निदानासाठी जवळील प्रयोगशाळेमध्ये दाखल करावे. मृत कोंबड्या कधीही उघड्यावर टाकू नयेत. त्यांची जाळून विल्हेवाट लावावी, अन्यथा रोग पसरण्याची शक्यता असते.

कोंबड्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पाळावा. लसीकरण अथवा हाताळणी केल्यावर त्यांच्यावरील ताण कमी करणारी औषधे पाण्यामधून द्यावीत. अधूनमधून शेडमधील कोंबड्यांना हलवावे. त्यामुळे त्या नव्या उमेदीने खाद्य खातात. त्यांच्या विक्रीच्या वजनात वाढ होण्यास मदत होते. शेडला लावलेले पडदे वेळोवेळी वर करावेत, त्यामुळे शेडमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते.

Leave a Reply