Nashik Onion market price : सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राज्यातील एकूण कांदा आवक अडीच लाख क्विंटलपेक्षा कमी असली, तरी मागच्या आठवड्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील कांदा आवक सोमवारी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे या ठिकाणच्या बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव नियंत्रणात राहिले.
संपूर्ण राज्यात सोमवारी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी २ लाख १५ हजार कांदा आवक झाली होती. त्यापैकी एकट्या नाशिक जिल्हयात सुमारे १ लाख १८ हजार क्विंटल आवक झाली. पैकी उन्हाळी कांद्याची आवक सुमारे ६०० क्विंटल झाली. त्यामुळे शनिवारच्या तुलनेत बाजारभाव ३०० रुपयांनी पडले.
लासलगाव बाजारात लाल कांदा आवक ही २० हजार ४२३ क्विंटल इतकी झाली. कमीत कमी बाजारभाव १२०० रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव ३३११ आणि सरासरी बाजारभाव २७०० रुपये प्रति क्विंटल असे होते. पिंपळगाव बाजारात पोळ कांदयाला सरासरी २७०० रुपयांचा बाजारभाव मिळाला. दरम्यान लासलगाव आणि निफाड बाजारात उन्हाळी कांद्याची आवक झाली.
लासलगाव बाजारात ५३७ क्विंटल, तर निफाड उपबाजारात ७५ रुपये क्विंटल कांदा आवक झाली. लासलगावला कमीत कमी १६०० आणि जास्तीत जास्त ३ हजार तर सरासरी २६०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळाले, तर निफाडला सरासरी २६५१ रुपये बाजारभाव प्रति क्विंटल मिळाले.
दरम्यान पुणे बाजारात लाल कांद्याला सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. सांगली बाजारात २३५० रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजारात २ हजार रुपये प्रति क्विंटल, तर नगर जिल्ह्यातील राहुरी- बांबोरी बाजारात २३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. नेवासा-घोडेगाव बाजारात २५०० रुपये प्रति क्विंटल, संगमनेर बाजारात १८७५ रुपये, कोपरगाव बाजारात २७२५ रुपये प्रति क्विंटल, पुण्याच्या मांजरी बाजारात ३१००रुपये प्रति क्विंटल, मोशी बाजारात २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.












