Natural farming: ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीसाठी घेतला पुढाकार; पहा सविस्तर…

Natural farming

Natural farming : राज्यभरात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती  (Natural farming) केली जाणार आहे.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या वतीने कृषी विभागाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी माहिती देण्यात आली. जालना जिल्ह्यातील २७०० हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी ५४ गटांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  (Natural farming)

तालुक्यातील क्लस्टर

* नैसर्गिक शेती क्लस्टरमध्ये दरेगाव, पोकळ वडगाव, गणेशपूर, मौजपुरी, रेवगाव, चितळी पुतळी, मोतीगव्हाण, वझर या गावांचा समावेश आहे.
* ८ गावे कृषी विभागाकडून जिल्ह्यातील आठ गावांचा नैसगिक शेती क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

नैसर्गिक शेतीचा उद्देश

* शासन राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे वळण्यासाठी अंमलबजावणी करीत आहे.
* रासायनिक विरहित पारंपरिक शेती पद्धत ही नैसर्गिक शेती आहे. पिके, झाडे आणि पशुधन यांना जैवविविधतेसह एकत्रित करते.
* या मागचा उद्देश नैसर्गिक शेतीमुळे आपली जैवविविधता टिकून राहावी हा आहे.

जिल्हाभरात आठ क्लस्टर

जिल्हाभरातील एकूण ८ क्लस्टरमध्ये २,७०० हेक्टर क्षेत्राची विभागणी करण्यात आली आहे. भोकरदन व जालना तालुक्यात सर्वाधिक ८ क्लस्टर आहेत या क्लस्टरमध्ये सुमारे चारशे हेक्टर जमीन नैसर्गिक शेती खाली येणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

तालुकानिहाय समूह स्थापनेचे उद्दिष्ट