सध्याच्या काळात महिलांनी स्वत:च्या पायावर उभं राहून स्वावलंबी होणं तसेच घराला आर्थिक हातभार लावणं खूप गरजेचं आहे.काही वेळेस कौशल्य असून देखील पैसे नसल्यामुळे व्यवसाय करता येत नाही. अशा महिलांसाठी सरकारने काही योजना काढल्या आहेत .
गरजू महिलांना या योजनेअंतर्गत सरकारकडून मदत मिळणार आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारच्या कोणत्या दोन योजना आहेत त्यांची माहिती आपण घेऊया. बँकांनी खास महिलांसाठी केंद्र सरकारच्या सूचनेवरून उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये महिलांना काहीही गहाण न ठेवता 5 लाखांपर्यंत लोन मिळू शकते अशी माहिती मिळाली आहे. या योजनेंतर्गत कमी व्याजदरात तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. शारीरिकदृष्ट्या विकलांग , अनुसूचित जमाती (SC-ST) ,अनुसूचित जाती, या महिलांसाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाते.
औद्योगिक कर्ज मिळवण्यासाठी सरकारी आणि खाजगी बँकेच्या मार्फत सहज कर्ज मिळू शकते . सारस्वत बँक आणि पंजाब व सिंध बँक या बँकेच्या मार्फत महिला कर्ज घेऊ शकतात . कॉफी आणि चहा पावडर बनवण्याचा, दुग्धव्यवसाय आणि पोल्ट्री संबंधित व्यवसाय, नोटबुक बनवण्याचा व्यवसाय, रोपवाटिका व्यवसाय, डायग्नोस्टिक लॅब, ब्युटी पार्लर व्यवसाय, कापूस धागा उत्पादन, कापड व्यवसाय, मसाल्याचा व्यवसाय, ड्राय क्लीनिंग व्यवसाय, बेडशीट आणि टॉवेल बनवण्याचा व्यवसाय, खाद्यतेलाचे दुकान, सुक्या मासळीचा व्यापार, खाण्याचा व्यवसाय, अशा खूप साऱ्या व्यवसायांसाठी महिलांना कर्ज मिळणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना स्वतःचा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना व सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना तसेच महिलांना कर्जाचा लाभ घेता येणार आहे. 30 टक्के आरक्षण असल्यामुळे महिलांना जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे . या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी maha-cmegp.org.in या वेबसाईटला भेट देऊ शकता . व ऑनलाईन अर्ज करू शकता.