खेड तालुक्यामधील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 18 शाखा मधून 27 हजार 859 शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 183 कोटी 87 लाख 15 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे.
यंदाच्या वर्षी मागील वर्षीपेक्षा 44 कोटी 57 लाख रुपये जास्त कर्जवाटप केल्याची माहिती बँकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली. मागील वर्षी खेड तालुक्यामधील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने 24388 सभासदांना या बँकेच्या 18 शाखांच्या माध्यमातून 139 कोटी 29 लाख 77 हजार रुपयांची खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप केले होते. यावर्षी शासनाने जाहीर केल्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पीक प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिले. या तालुक्यामधील 67 हजार 676 ला भर धन पैकी 20 हजार 962 शेतकऱ्यांना 67 कोटी 38 लाख 25 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत.
शैक्षणिक कर्ज ,वाहन कर्ज, घर कर्ज ,बिगर शेती कर्ज ,मिळून 68 कोटी 27 लाख रुपयांची वाटप तालुक्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांसाठी टोमॅटो, ज्वारी, भात, बटाटा, आणि इतर पिकांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप केले जात. आहे तालुक्यामध्ये सर्वात जास्त बटाटा आणि टोमॅटो या पिकाला पीक कर्ज वाटप केले आहे. यावर्षी 27 हजार 859 शेतकऱ्यांना 19 हजार 408 हेक्टर क्षेत्रासाठी 183 कोटी त्यांची लाख पंधरा हजारांची कर्जवाटप झाले आहे.
शाखानिहाय सभासद संख्या कंसात पीककर्ज वाटप :
राजगुरुनगर २७७४ (२६ कोटी २९ लाख ६७ हजार रुपये, आळंदी : ७४२ (५ कोटी २३ लाख ७५ हजार रुपये), चाकण : २६८४ (१८ कोटी ८० लाख ८५ हजार रुपये), वाडा : २१८१ (१० कोटी ९५ लाख ९ हजार रुपये), कडुस: २३७१ (१६ कोटी ७३ लाख ७८ हजार रुपये), वाफगाव २४९८ (१६ कोटी ५३ लाख २९ हजार रुपये),
पाईट : १८६४ (१५ कोटी ६८ लाख ७५ ५हजार रुपये), चास ११६८ (७ कोटी ४ लाख १५ हजार रुपये), डेहणे : ७७३ (४ कोटी ३० लाख ०८ हजार रुपये), दावडी ८६० (४ कोटी ९४ लाख २० हजार रुपये), भोसे : २३६२ (१५ कोटी ४२ लाख रुपये),
बहुळ : ११६१ (८ कोटी ०५ लाख ५० हजार रुपये), कुरकुंडी : १८६९ (१३ कोटी ५९ लाख २८ हजार रुपये), मरकळ ४१४ (२ कोटी ९६ लाख २० हजार रुपये), पाबळ रोड : १२४२ (७ कोटी १२ लाख ३२ हजार रुपये), आंबोली : १५६३ (१० कोटी ५२ लाख ४४ हजार रुपये), शिवे : ६८८ (४ कोटी ९१ लाख ८५ हजार रुपये),