
Lasalgaon Market : लासलगाव बाजारसमितीत शेतमालाचे व्यवहार डिजिटल होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याला बाजारसमिती व्यवस्थापनाने प्राधान्य दिले आहे. याबद्दलचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.
आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारसमिती म्हणून लासलगाव प्रसिद्ध असून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये सर्वात सरस बाजारसमिती म्हणून मागील वर्षी या बाजाराचा गौरवही झाला आहे. आता कांद्यासह, सोयाबीन, मका आणि इतर शेतमालाचे व्यवहार डिजिटल होणार आहेत. त्यासाठी बाजारसमितीत शेतकऱ्यांना नाव नोंदणी करावी लागणार आहे.
एका ॲपद्वारे ही डिजिटल प्रक्रिया राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांनी हे ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून आपली माहिती भरायची आहे. तसेच बाजारसमितीतही डिजिटल नोंदणी करायची आहे. त्यानंतर जेव्हा-केव्हा बाजारसमितीच्या माध्यमातून शेतमाल खरेदी होईल, त्यावेळेस शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे. लासलगावसह उपबाजारातही ही प्रणाली कार्यरत होणार आहे.