शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना, शेतमाल तारण ठेवून मिळणार 75 टक्यांपर्यंत कर्ज.

shetmal taran yojana

शेतकऱ्यांनी आपली पिके बाजारात विकण्यापूर्वी कालावधीपर्यंत ठेवल्यास त्यांना चांगला भाव मिळू शकतो.कृषी पणन मंडळ 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची रास्त किंमत मिळवून देण्यासाठी मदत करत आहे.

बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतमालाच्या काढणीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ त्वरित कर्ज उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (Maharashtra State Board of Agriculture Marketing) शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहे. योजनेचे स्वरूप कसे आहे कर्ज कसे दिले जाते ? या संदर्भात अधीक माहिती जाणून घेऊया.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्केपर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज दरात तारण कर्ज देण्यात येते. ही योजना पणन मंडळाच्या स्वनिधीतून बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत अनुदान स्वरुपात देण्यात येते.शेतकर्‍यांना त्यांची पिके ठेवण्यासाठी जागा मोजावी लागत नाहीत कारण बाजार समिती भाड्याने देणे, विमा काढणे आणि साठवणुकीची जागा निश्चित करणे या खर्चाची काळजी घेते.

कर्ज परतफेड सहा महिन्याच्या आत करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याज सवलत मिळते. ज्या बाजार समित्या स्वनिधीतून तारण कर्ज राबवतात त्यांना वाटप केलेल्या तारण कर्ज रकमेवर तीन टक्के व्याज सवलत तसेच अनुदान स्वरूपात मिळते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) तसेच कृषी पणन मंडळाची विभागीय कार्यालय येरवडा पुणे 6 येथे प्रत्यक्ष dsopune6@gmail.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *