आता घरबसल्या करा तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक या सोप्या पद्धतीने …

adhar card

बँकिंगशी संबंधित किंवा इंटरनेट बँकिंग करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. पॅन कार्ड व आधार बँक खात्याशी लिंक करण्याचा आग्रह आजकाल सरकार धरत आहे.

जर तुमचे बँक खाते आधारकार्डशी लिंक झाले नसेल, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या व अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लींक करू शकता.

तुम्ही घरी बसून मोबाइल अॅप किंवा ऑनलाइन इंटरनेट बँकिंगद्वारे तुमचे बँक खाते आधारशी लिंक करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

बँक खाते आधारशी लिंक करणे आरबीआयच्या म्हणण्यानुसार आवश्यक आहे. कारण मनी लाँडरिंगच्या तिसऱ्या सुधारणा कायदा 2019 नुसार, तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. हे महत्त्वाचे केवायसी दस्तऐवजांपैकी एक आहे

आधार ऑनलाइन कसे लिंक करायचे

  • सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • आता तुमच्या इंटरनेट बँकिंगमध्ये लॉग इन करा.
  • आता माझे खाते विभागात जा आणि बँक खात्यासह आधार अपडेट करा.
  • आधार अपडेट करण्यासाठी तुमचा लॉगिन पासवर्ड पुन्हा एकदा एंटर करा.
  • येथे आधार क्रमांक टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा. आता तुमचे आधार बँकेशी लिंक केले जाईल.
  • याप्रमाणे अॅपशी आधार लिंक केले जाईल
  • तुम्ही आधार लिंक करण्यासाठी बँक अॅप्लिकेशन वापरत असाल तर तुमच्या अॅपवर लॉग इन करा.
  • आता My Account वर जा आणि आधार तपशील तपासा.
  • जर अपडेट नसेल तर अपडेट तपशीलावर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • आधार अपडेट केल्यानंतर तुम्हाला एक संदेश मिळेल.

 

source:- majhapaper

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *