तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात रणसिंग फुंकले आहेत.
यामुळे आता त्यांना राज्यात किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी 24 तास मोफत वीज वर्षाला एकरी दहा हजार रुपये तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पाच लाख रुपये अशी आकर्षक घोषणा करत. ‘अबकी बार किसान सरकार’ म्हणून जोरदार तयारी केली आहे.
अगोदर विदर्भ मराठवाड्यात जंगी सभा घेतल्यानंतर के सी आर यांचे गुलाबी वादळ आता पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर, सोलापूर या दिशेने आले आहे.
आता प्रश्न आहे की शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे .के सी आर हे 1985साली पहिल्यांदा आमदार झाले होते .तिथून पुढे चार टर्म ते आमदार राहिले त्यांनी शेतकऱ्यांची अनेक प्रश्न सोईला लावले.