Mango paste management: बदलत्या हवामानामुळे आंब्यावर फुलकिडींचा प्रादुर्भाव; असे करा उपाय…

Mango paste management: सध्या कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत असून, ती फुलकिडींच्या (थ्रीप्स) वाढीसाठी पोषक आहे. या किडीचा आंबा मोहर आणि फळांवर प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.

ही कीड कोवळ्या सालीचा भाग खरवडत असल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. मोहराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात व मोहर काळा पडून गळून जातो.

फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळाची साल खरवडल्यासारखी दिसते. फळांवर खाकी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात. लहान फळांची गळ होते.

फुलकिडींच्या नियंत्रणासाठी, स्पिनोसॅड (४५ एससी) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास, दुसरी फवारणी ८ ते ९ दिवसांनी थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून घ्यावी. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची हा सल्ला दिला आहे.

Leave a Reply