onion market : या आठवड्यात देशात कांदा आवक घटण्याचा ट्रेंड; जाणून घ्या बाजारभाव..

onion market : मागील आठवड्यातम म्हणजेच २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान देशभरात कांद्याची आवक ४ लाख १२ हजार मे. टन इतकी झाली. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे १ लाख ९२ हजार टन, गुजरातमध्ये ९३ हजार टन, मध्यप्रदेशमध्ये २५ हजार ५०० टन, उत्तर प्रदेशमध्ये ४० हजार ६०० टन, कर्नाटकमध्ये २१ हजार ७५१ टन, तेलंगानामध्ये ८ हजार ८०० टन अशी आवक झाली.

त्याआधीच्या आठवड्यात म्हणजेच २० ते २६ जानेवारी दरम्यानही देशातील आवक ही सुमारे ६० हजार टनांनी कमी होती. म्हणजेच ३ लाख ५६ हजार ८५५ हजार मे. टन इतकी होती. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे १ लाख ६६ हजार ५०० टन, गुजरातमध्ये ७४ हजार ८१५, टन, मध्यप्रदेशात १९ हजार ७१७ टन, उत्तर प्रदेशात ३६ हजार टन, कर्नाटकमध्ये १५ हजार ५०० टन, तर तेलंगानामध्ये ७ हजार ४०० टन इतकी होती.

दरम्यान सोमवारी संपूर्ण राज्यातील कांदा आवक ही ९० हजार ९०० मे. टन इतकी होती. महाराष्ट्रात ५८ हजार ४४२, गुजरातमध्ये १५ हजार ४२८, उत्तरप्रदेशमध्ये ५ हजार ९३३, मध्यप्रदेशमध्ये ३ हजार ५९१ प्रत्येकी मे. टन अशी होती.

मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी मात्र त्यात घट होऊन ती ५३ हजार २५४ टन इतकी झाली. त्यात राज्यात १९ हजार ९२३ टन, गुजरातमध्ये १४ हजार ३९५, कर्नाटकमध्ये अडीच हजार टन, उत्तर प्रदेशमध्ये ५ हजार ६७८ टन, तेलंगानामध्ये ९३८ टन इतकी होती. रविवारी आलेल्या सुटीमुळे अनेक बाजार बंद राहिल्याने सोमवारी आवक वाढलेली दिसून आली. मात्र मंगळवारी ती घटलेली दिसली.

दरम्यान बुधवार दिनांक ५ जानेवारी रोजी या आवकेत आणखी घट होऊन ती ३६ हजार ८३३ मे. टन इतकी कमी झाली. त्यापैकी राज्यात १५ हजार ४१० मे. टन, गुजरातमध्ये ९ हजार ४६६ मे. टन, मध्यप्रदेशमध्ये २३५८ मे. टन, उत्तर प्रदेशमध्ये ५३११ मे. टन, कर्नाटकमध्ये ५५२ मे. टन अशी होती.

Leave a Reply