राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा ?

राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; 'या' तारखेला होणार परीक्षा

राज्यभरामध्ये आता तब्बल 5000 कोतवाल पदे भरली जाणार आहेत . राज्य सरकारकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा होणार आहे.  रिक्त पदांच्या 80% पर्यंत मर्यादित कोतवाल पदे भरली जाणार आहेत.  सध्या तलाठी भरती सुरू असून यानंतर कोतवाल भरती झाल्यास महसूल विभागाच्या कामास गती येणार आहे. 

80 टक्के पदे भरणार.. 

राज्यभरामध्ये गावामध्ये महसूल विभागाचे शासनाच्या बहुतांश कामाची पूर्तता करण्यासाठी कोतवाल पद महत्त्वाचे ठरले आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोतवाल पदाची भरती व्हावी अशा मागण्या आल्या होत्या राज्य शासनाने तलाठी भरती सुरू केली असतास कोतवाल भरती प्रक्रिया करण्यासंदर्भात भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  21 जुलै रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनातून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.  राज्यातील जिल्ह्यांमध्ये रिक्त पदाचे 80 टक्के पर्यंत कोतवाल पदे भरली जाणार आहेत.  विशेष बाब म्हणून भरतीला शासनाने मान्यता दिली आहे. 

भरती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमाची काटेकर पालन करून 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरती प्रक्रिया पार पाडवी अशा लेखी सूचना दिले आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यामधील उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील भरती प्रक्रिया करण्याच्या सूचना नियमित करण्यात आलेले आहेत . यामुळे लवकरात लवकर कोतवाल पदे भरली जाणारा असून महसूल विभागाच्या कामात गती येणार आहे.  तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील अशी आशा आहे.  दरम्यान  भरती प्रक्रियेमध्ये तालुक्या स्तरावर भरती घ्यावी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि गुणवत्ता युक्त विद्यार्थी भरती होतील अशी मागणी होत आहे. 

5000 पदे रिक्त

तब्बल सहा वर्षानंतर कोतवाल भरती होत आहे.  राज्यात 12,667 पदे मंजूर असून 8000 पदे कार्यरत आहे . आता सध्या सुमारे 5000 पदे भरण्यात येणार आहेत तलाठी सज्ज पुनर्रचनानुसार 16 हजार पदे भरणे अपेक्षित आहे.  पुनर्रचना व रिक्त पदांनुसार 80 टक्के पदे भरली जाणार आहेत.  अनेक कोतवाल कोरोना काळात कामावर असतानाच मृत्युमुखी पडले असून कोतवालांच्या पाल्यांना अनुकंपा खाली सामावून घ्यावी अशी मागणी कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवप्रसाद देवणे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *