टोमॅटोच्या एका कॅरेटला इतका दर मिळाला म्हणून , बीडच्या शेतकऱ्याचा तोफा वाजवून जल्लोष साजरा,पहा सविस्तर..

टोमॅटोच्या एका कॅरेटला इतका दर मिळाला म्हणून , बीडच्या शेतकऱ्याचा तोफा वाजवून जल्लोष साजरा ,पहा सविस्तर

राज्यभरामध्ये भाजीपाल्याचे  दर  गगनाला भिडले आहेत. मेथी पासून टोमॅटो पर्यंत आणि मिरची पासून लसणापर्यंत सर्वाचेच भाव वाढलेले आहेत. टोमॅटो विकून जास्त पैसे मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. कारण टोमॅटोची आवक बीडमध्ये कमी झाल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत , याचाच फायदा शेतकऱ्यांना होत आहे. 

बीडच्या अडत मार्केटमध्ये एका शेतकऱ्याच्या टमाटोला घसघशीत दर मिळाला असून हातात भरपूर पैसा आला, त्यामुळे घरातून निघताना अपेक्षाही त्यांनी केली नव्हती त्यापेक्षा खूपच जास्त रक्कम त्यांना मिळाली. त्यामुळे हा शेतकरी प्रचंड खुश झाला व त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी चक्क तोफा वाजवून जल्लोष साजरा केला.  टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्याची बीडच्या आडत बाजारात लगबग सुरू झाली आहे. सध्या बीडच्या आडत मार्केटमध्ये टोमॅटोच्या 22 किलोच्या कॅरेटला 2000 ते 2300 रुपयांचा भाव मिळत आहे . यामुळे शेतकऱ्याचे चांगले दिवस आले आहे.  कधी नवे ते या हंगामात टोमॅटोच्या उत्पादनातून भरपूर पैसा हाती येत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. 

शेतकऱ्यांनी तोफा वाजवल्या

बीडचा शेतकरी शनिवारी मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन आला होता.  त्याच्या टोमॅटोला 22 किलोच्या कॅरेटला चक्क 2000 रुपयांचा भाव मिळाला.  हातात रोखीने पैसे आले त्यामुळे शेतकऱ्याला प्रचंड आनंद झाला या आनंदाच्या भरात थेट मार्केटमध्येच तोफा वाजवून आनंद व्यक्त केला.  प्रचंड जल्लोष साजरा केला.  या शेतकऱ्याला आनंदित पाहून इतर शेतकरी त्याच्या आनंदामध्ये सहभागी झाले त्यांनी आनंद साजरी केला. 

भाव काय?

सध्या बीडच्या बाजारात समितीमध्ये टोमॅटो चा भाव 130 ते 140 रुपये किलो इतका आहे.  मुंबई, पुणे च्या ठिकाणी टोमॅटो 140 ते 150 रुपये किलोने विकले जात आहे. 

आवक घटली

दरम्यान धुळे तालुक्यात टोमॅटोची आवक होत नसल्याने बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे नारायणगाव, पिंपळगाव, पुणे तसेच इतर परिसरातून होत असलेल्या टोमॅटोची आवक हव्या तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने सध्या टोमॅटोचे भाव वाढत आहेत.  साधारणपणे 40 रुपये ते पन्नास रुपये दराने उपलब्ध होत असलेला टोमॅटो सध्या 80 ते 100 रुपये प्रति किलो दराने बाजारात मिळत आहे.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येत्या काही महिन्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटोची आवक सुरू होईल.  त्यानंतर टोमॅटो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.  असे व्यापारी तसेच विक्रेत्यांचे म्हणणे आहे.  परंतु सध्या मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या टोमॅटो जास्त दराने खरेदी करावा लागत आहे.  त्याचबरोबर हिरवी मिरचीची किंमत वाढलेली आहे.  परंतु कोबी दरामध्ये घट झालेली दिसून येत आहे . इतर सर्व भाज्यांचे दर आवक कमी राहिल्यामुळे किलो मागे दहा ते वीस रुपये वाढले आहेत.  आगामी एक ते दीड महिना आणखीन असेच बाजार राहतील. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *